Success Story: मधुमक्षिका पालन करून तिनं घेतली उत्तुंग भरारी; २०२१ चा विदर्भरत्न पुरस्कार जाहीर

सतीश तुळसकर 
Monday, 25 January 2021

प्राजक्ता रोहित कारू यांना त्यांनी केलेल्या मधुमक्षिका पालन या जोखमीच्या अभिनव उपक्रमासोबतच मधमाश्यांच्या वसाहतींचे संवर्धन करून मधविक्रीव्यवसाय यशस्वी उद्योग करून आजच्या तरुणींना आदर्श घडवून दिला त्याबद्दल त्यांना हा वैदर्भीय पुरस्कार जाहीर झालेला आहे .

उमरेड (जि. नागपूर) : गेल्या काही वर्षांपासून नागपूरचे स्वतंत्र संग्राम सेनानी स्व. रा.पै. समर्थ गुरुजी यांच्या स्मरणार्थ वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना नागपूररत्न तथा विदर्भरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येतो , यंदा असाच "विदर्भरत्न" पुरस्कार गडचिरोली च्या मधकन्या प्राजक्ता आदमने म्हणजे आत्ताच्या उमरेड शहरात वास्तव्यास असलेल्या सौ प्राजक्ता रोहित कारू यांना त्यांनी केलेल्या मधुमक्षिका पालन या जोखमीच्या अभिनव उपक्रमासोबतच मधमाश्यांच्या वसाहतींचे संवर्धन करून मधविक्रीव्यवसाय यशस्वी उद्योग करून आजच्या तरुणींना आदर्श घडवून दिला त्याबद्दल त्यांना हा वैदर्भीय पुरस्कार जाहीर झालेला आहे .

माहेर /जन्मगाव गडचिरोलीचे असून सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या प्राजक्ताची आर्थिक परिस्थिती ही सर्वसामान्य होती , आई शिक्षिका तर वडिलांचा बिल्डिंग मटेरियल चा व्यवसाय होता , प्राजक्ताचे १२ वी पर्यंतचे शिक्षण हे गडचिरोलीला झाले तर त्यानंतर तिने नागपूरला डी फार्म ची डिग्री मिळविली इतक्यावरच ती थांबली नाही तर विद्येचे माहेरघर पुणे येथे जाऊन तिने मार्केटिंग मध्ये एमबीए ची पदवी पूर्ण केली आणि तिथेच एका नामांकित कंपनीत नौकरी करू लागली , मात्र तिच्या मनात सतत जन्मभूमीची आणि तेथील वन वैभवाची ओढ लागलेली असायची बालपण गडचिरोली सारख्या घनदाट जंगल असलेल्या नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागात जीवन व्यतीत केल्यामुळे तिला तिथल्या वनश्री शी निगडित जैवविविधतेवर अभ्यास करून व्यवसाय करण्याचे मनात आले.

हेही वाचा -  अखेर छडा लागला! पत्नीच्या प्रेमसंबंधास पतीचा होता विरोध; प्रियकराच्या मदतीने काढला काटा 

तिने लहानपणापासून जंगलामध्ये आदिवासी लोकांना मध गोळा करतांना पाहिले होते आणि त्यानंतर शहरात शिक्षण घेत असताना मधुमक्षिका पालन व्यवसायबद्दल माहिती मिळविली होती ,त्यानंतर तिने पुण्याचा निरोप घेऊन गडचिरोलीला परत आली,घरच्यांकडून मधुमक्षिका पालन व्यवसाय जोखमीचा असल्याने विरोध होत असताना तिने आई वडिलांना विश्वास दिला की मी हा व्यवसाय यशस्वीरीत्या पूर्ण करून दाखवेल. दिल्ली ला जाऊन मधुमक्षिका पालनाचे शास्त्रोक्त पद्धतीने धडे गिरवून तिने गडचिरोलीच्या जंगलात ५० पेट्यांपासून व्यवसायाला सुरुवात केली , सोबतच मधमाश्यांच्या वसाहतींचे संवर्धन करणे त्यांना मध निर्मिती साठी अनुकूल असलेली वनस्पती , झाडे लागवड करणे ज्यामध्ये योग्य प्रकारे पराग सिंचन मधमाश्यांना करता येईल आणि जास्तीत जास्त प्रमाणात मधाचे उत्पादन घेता येईल .

कस्तुरी हनी हा स्वतःचा ब्रँड बाजारात आणला नवीन प्रयोग म्हणून जांभूळ ,बोर ,सूर्यफूल ,लीची ,तुळस निलगिरी इत्यादी झाड वनस्पती चा उपयोग करीत नवीन चवीच्या मधाची विक्री त्या करीत आहेत प्राजक्ता या फक्त मध उत्पादनावर न थांबता परागकण आणि बी व्हेनिम ची विक्री करीत आहेत त्या वर्षाला एक टन मालाची विक्री करतात प्राजक्ता यांच्यामते मध उत्पादन हा उत्तम शेती पूरक व्यवसाय असून या व्यवसायाचा त्या प्रचार व प्रसार आसपासच्या गावातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन करीत असतात तो प्राजक्ता करू यांना बेस्ट महिला उद्योजिका विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन लेडीज विंग ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती जेम्स ऑफ गडचिरोली बेस्ट सेल्स अवॉर्ड एल इ डब्लू २०१७ इत्यादी पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले आहे. 

नक्की वाचा - कुस्त्यांची दंगल ठरली मंगल! निधीतून 'बेटी बचाओ बेटी पढाओ' अभियानाला हातभार लावणार 

प्राजक्ता यांचा उपक्रम राजस्थान , मध्यप्रदेश , पंजाब आणि महाराष्ट्रात सुरू आहे गेल्या चार वर्षांपासून त्या ह्या क्षेत्रात कार्यरत आहेत , महिलां पुढे एक नवा आदर्श त्यांनी उभा केला आहे त्यांनी तयार केलेल्या मधाचा दर्जा आणि गुणवत्ता उत्कृष्ट असल्यामुळे मधला प्रचंड मागणी आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman successful by doing Beekeeping got Vidarbharatna award