अखेर छडा लागला! पत्नीच्या प्रेमसंबंधास पतीचा होता विरोध; प्रियकराच्या मदतीने काढला काटा 

Wife attacked on husband with help of boyfriend in Yavatmal
Wife attacked on husband with help of boyfriend in Yavatmal

कळंब (जि. यवतमाळ) : प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच पतीचा खून केल्याची घटना खुटाळा परिसरात घडली आहे. दहा दिवसांपूर्वी झालेल्या खुनाचा उलगडा पोलिसांनी केला असून ठाणेदार राठोड यांनी मृताची पत्नी व दोन आरोपी असे तिघांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कळंब तालुक्‍यातील खुटाळा गावशिवारात पांडुरंग वाघमारे यांची शेती राळेगाव तालुक्‍यातील वाऱ्हा येथील गजानन चिव्हाणे यांनी मक्‍त्याने केली आहे. शेतावर नामदेव गोंदूजी पेंदाम (वय 50) यांना रखवालदार म्हणून ठेवले होते. 12 जानेवारीला अनोळखी व्यक्तीने वडिलांचा खून केल्याची तक्रार मुलगा योगेश याने कळंब पोलिस ठाण्यात दिला होता. ठाणेदार अजित राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असता नामदेवच्या डोक्‍यावर, तोंडावर व कानावर खोल जखमा दिसून आल्या. त्यामुळे त्याचा खून झाला या निर्णयावर पोलिस आले. परंतु एका रखवालदाराचा खून कोणी व का केला? हे आव्हान पोलिसांपुढे होते. 

दहा दिवसानंतर ठाणेदार राठोड यांनी तपासाची चक्रे फिरवून मृत नामदेवची पत्नी (वय 40 वर्षे) तिचा प्रियकर मारुती हरबा अराळे (वय 42 वर्षे, दोघेही रा. वाऱ्हा) व निकेश गुलाबराव करलुके (रा. दोनोडा, तालुका कळंब) यांना अटक केली. मंदा पेंदाम व मारुती अराळे यांचे चार वर्षांपासून प्रेमसंबंध असून तिचा नवरा अडसर ठरत असल्यामुळे त्याला संपविण्याचा बेत मंदाने आखल्याचे पोलिस चौकशीत उघड झाले. 

नवऱ्याला मारण्यासाठी मंदाने कळंबवरून स्पेशल ऑटो करून प्रियकराला नवरा राहत असलेले शेत दाखविले. त्यातच दोनोडा येथील निकेश गुलाबराव करलुके यांच्याकडे मारुती अराळेचे पाच हजार रुपये होते. परत त्याला पंधरा हजार रुपये देऊ केले. खून करण्यासाठी त्याने साथ दिल्याचे निकेश करलुके यांनी सांगितले. 12 जानेवारीला रात्री शेतावर जाऊन त्यांनी काठ्यांनी मारहाण करून नामदेव पेंदाम याचा खून केला. प्रेमात आंधळ्या झालेल्या पत्नीने प्रियकरासाठी आपल्या हाताने आपल्या कपाळाचे कुंकू पुसले. 22 जानेवारीलाला रात्री 8.30 वाजता पोलिसांनी तिघांनाही अटक करून खुनाचा गुन्हा नोंदविला. ठाणेदार अजित राठोड यांच्या मार्गदर्शनात राजीव कुडमेथे, ओम धारणे, सचिन ठाकरे गजानन धात्रक पुढील तपास करीत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com