नागपूर जिल्हा परिषदेत महिलांचे वर्चस्व, सहापैकी चार पदांवर महिला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

पुरुषांची संख्या ही महिलांच्या तुलनेत तशीही कमीच आहे. त्यातच यंदाचे अध्यक्षपदही अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असल्याने बहुमताचा आकडा गाठलेल्या कॉंग्रेसने पारशिवनी तालुक्‍यातील टेकाडी सर्कलमधून विजयी झालेल्या रश्‍मी बर्वे यांची वर्णी लावली. तर आज समाजकल्याण, महिला व बालकल्याण व इतर दोन सभापतिपदासाठी निवडणूक झाली. समाजकल्याण सभापतिपद हे अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील व्यक्तीसाठी राखीव होते.

नागपूर : जिल्हा परिषदेत अध्यक्षपदासह तीन सभापतिपदावर महिलांची निवड झाली आहे. त्यामुळे सहापैकी चार महत्त्वांची पदे महिलांकडे आली आहेत. 58 सदस्य संख्या असलेल्या नागपूर जि. प.मध्ये यंदाच्या निवडणूकीत एकूण 31 महिला निवडून आल्या आहेत.

अवश्य वाचा - युवतीने केला ‘स्पीड चेक’ अन घडले हे

पुरुषांची संख्या ही महिलांच्या तुलनेत तशीही कमीच आहे. त्यातच यंदाचे अध्यक्षपदही अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असल्याने बहुमताचा आकडा गाठलेल्या कॉंग्रेसने पारशिवनी तालुक्‍यातील टेकाडी सर्कलमधून विजयी झालेल्या रश्‍मी बर्वे यांची वर्णी लावली. तर आज समाजकल्याण, महिला व बालकल्याण व इतर दोन सभापतिपदासाठी निवडणूक झाली. समाजकल्याण सभापतिपद हे अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील व्यक्तीसाठी राखीव होते. तर महिला व बालकल्याण हे सभापतिपद महिला सदस्यासाठी राखीव होते. तर इतर दोन विषय समितीची सभापती पदेही खुल्या प्रवर्गातील सदस्यांसाठी राखीव होते. या चारही विषय समिती सभापतींपैकी समाजकल्याण सभापतिपदी कॉंग्रेसच्या नांद सर्कलच्या नेमावली माटे यांची वर्णी लागली. महिला बालकल्याण सभापतिपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उज्ज्वला बोढारे यांची निवड झाली. तर खुल्या प्रवर्गातील सभापतिपदी कॉंग्रेसच्या भारती पाटील व तापेश्‍वर वैद्य यांची निवड झाली. सहा पदाधिकारी संख्या असलेल्या जि. प.मध्ये चार पदांवर महिलांच आहेत. तर उपाध्यक्ष म्हणून मनोहर कुंभारे व एका सभापतिपदी तापेश्‍वर वैद्य राहणार आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिला सदस्यांची संख्या ही तशीही जास्त आहेच. त्यातच अध्यक्ष व तीन सभापतिपदीही महिला विराजमान असल्याने जि. प.मध्ये आता महिलांचे वर्चस्व असणार आहे.

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women dominance in Nagpur Zilla Parishad, women in four out of six positions