युवतीने केला "स्पीड चेक' अन् घडले विपरित...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

नागपूर : दुचाकी चालवणे शिकत असताना दुचाकीची गती तपासून पाहणे एका युवतीच्या जिवावर बेतले. भरधाव दुचाकी भिंतीवर आदळली. यात गंभीर जखमी होऊन युवतीचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सायंकाळी सातला शांतीनगरात घडला. शिवानी युवराज वानी (वय 20, रा. कावरापेठ, चारनल) असे मृत युवतीचे नाव आहे.

नागपूर : दुचाकी चालवणे शिकत असताना दुचाकीची गती तपासून पाहणे एका युवतीच्या जिवावर बेतले. भरधाव दुचाकी भिंतीवर आदळली. यात गंभीर जखमी होऊन युवतीचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सायंकाळी सातला शांतीनगरात घडला. शिवानी युवराज वानी (वय 20, रा. कावरापेठ, चारनल) असे मृत युवतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवानी हिने नुकतीच नवीन मोपेड घेतली आहे. तिला दुचाकी शिकायची असल्यामुळे तीन दिवसांपासून सराव सुरू केला होता. मात्र, मंगळवारी सायंकाळी थोडे दूरवरून फिरून येते म्हणून दुचाकी घेऊन घराबाहेर पडली. मात्र, कावरापेठमधील रेल्वेच्या संरक्षण भिंतीवर भरधाव दुचाकी आदळली. तिच्या डोक्‍याला जबर मार लागला. नागरिकांनी तिला मेयोत दाखल केले. मात्र, शिवानीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

- माथ्यावरील पदवीचा डाग बाजूला ठेवून चहा विकून भरतात पोटाची खळगी

तीन मुली अचानक बेपत्ता, प्रियकराने फूस लावल्याचा संशय
वेगवेगळ्या घटनांमध्ये शहरातून तीन मुली बेपत्ता झाल्याचे समोर आले. तिन्ही मुलींना प्रियकराने फूस लावून पळवून नेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्‍त केला आहे.

पहिल्या घटनेत, जरीपटकाहद्दीत राहणारी 15 वर्षीय मुलगी आपल्या वडिलांसह लालगोदाम येथे कामाला गेली हाती. वडील कामात व्यस्त असताना ती काही न सांगता अचानक निघून गेली. मुलगी कुठेही दिसत नसल्याने वडिलांनी तिचा शोध घेतला; मात्र ती सापडली नाही. अखेर तिला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

- अरेच्चा ! ग्रामसभा अर्धवट सोडून सचिव पळाला
 

दुसरी घटना ही जरीपटका पोलिस ठाण्यांतर्गत घडली. परिसरात राहणारी 17 वर्षीय मुलगी घरी कोणाला काही न सांगता निघून गेली. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेऊन थकल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली. तिसऱ्या घटनेत, एमआयडीसी हद्दीत राहणारी 15 वर्षीय मुलगी अचानक घरून निघून गेली. शोध घेऊन ही मिळत नसल्याने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. तिन्ही घटनांमध्ये मिळालेल्या तक्रारीवरून संबंधित ठाण्यांमध्ये अज्ञात आरोपींवर अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unfortunate incident happened at nagpur while learning two wheeler