वर्क फ्रॉम होम' करणाऱ्या महिलांच्या व्यवसायात मंदी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

ऑनलाईन वस्तु, कपडे, सौंदर्य प्रसाधने विकुन महिला घरबसल्या 300 ते 500 रुपये सहज कमवितात. परंतु, कोरोनामुळे वस्तुंची होम डिलीव्हरी करणे कठीण झाले आहे. त्यामुळे ऑर्डर घेण्याची आणि ती पोहचविण्याची रिस्क कुणीही महिला घेत नाहीत. याच कारणाने वर्क फ्रॉम होमच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात मंदी आल्याचे दिसते.

नागपूर : सध्या सर्वच शासकीय आणि निमशासकीय संस्थांनी वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून देत, आपल्या कर्मचाऱ्यांना घरून कार्यालयीन कामे करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परंतु, नेहमी "वर्क फ्रॉम होम' करणाऱ्या म्हणजेच घरून ऑनलाईन वस्तु विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या व्यवसायात मात्र मंदी आली आहे.
घरून काम करणाऱ्या महिला आपल्या व्हॉट्‌सऍप गृपवरील सदस्यांकडून आलेल्या मागणीनुसार होलसेलर्सकडून अथवा विशिष्ट ऍपवरून वस्तुंची खरेदी करतात. त्यानंतर संबंधित व्यक्तीचा सविस्तर पत्ता घेऊन, त्यांच्या घरी तीन दिवसाच्या आत वस्तु पोहोचविण्याची व्यवस्था करतात. यातुन संबधित कंपनी अथवा ऍपकडून त्या महिलेला ठरावीक रक्कम कमिशन स्वरूपात दिली जाते. अशा पद्धतीने ऑनलाईन वस्तु, कपडे, सौंदर्य प्रसाधने विकुन महिला घरबसल्या 300 ते 500 रुपये सहज कमवितात. परंतु, कोरोनामुळे वस्तुंची होम डिलीव्हरी करणे कठीण झाले आहे. त्यामुळे ऑर्डर घेण्याची आणि ती पोहचविण्याची रिस्क कुणीही महिला घेत नाहीत. याच कारणाने वर्क फ्रॉम होमच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात मंदी आल्याचे दिसते. कोरोनामुळे नेहमीचे ग्राहक रोडावण्याची भितीही ऑनलाईन वस्तु विक्री करणाऱ्या महिलांना सतावत आहे.

सविस्तर वाचा - अकरा विदेशींना ठेवले होम क्वॉरेंटाइनमध्ये! पोलिसांनी छापा टाकून घेतले ताब्यात

ग्राहक कमी झालेत
वर्षभरापासून ऑनलाईन वस्तु विक्रीचा व्यवसाय मी करते आहे. यासाठी फेसबुक, व्हॉट्‌सऍप सारख्या ऍपवर महिलांचा गृप तयार करून, घरूनच ऑनलाइन वस्तु विक्री करते. या व्यवसायात खरेदी केलेली वस्तु ग्राहकांना तीन दिवसात मिळणे आवश्‍यक असते. परंतु, कोरोनामुळे आता वस्तुंची डिलीव्हरी होत नसल्याने, ग्राहक कमी झाले आहेत.
जुही काकडे, वक्र फ्रॉम होम व्यावसायिक, नागपूर.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women"s business is on hold due to corona