अकरा विदेशीं होम क्वॉरेंटाइनमध्ये! पोलिसांनी छापा टाकून घेतले ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

तिर्किस्तान येथून 11, दिल्ली, ओडिसा आणि केरळ येथून आलेले प्रत्येकी 1 अशा एकूण 14 व्यक्ती मशिदीमध्ये असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकला. या 11 व्यक्तींना शहरातील वन अकादमी येथे होम क्वॉरेंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे.

चंद्रपूर : कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून प्रशासनाच्या वतीने कठोर अंमलबाजवणी केली जात आहे. विदेश, तसेच दुसऱ्या राज्यातून आलेल्यांनी स्वत: माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, तिर्किस्तान येथून 11, दिल्ली, ओडिसा आणि केरळ येथून आलेले प्रत्येकी 1 अशा एकूण 14 व्यक्ती मशिदीमध्ये असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकला. या 11 व्यक्तींना शहरातील वन अकादमी येथे होम क्वॉरेंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. ही कारवाई बुधवारी करण्यात आली.
मागील काही दिवसांपासून संपूर्ण जगात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. देशासह राज्यात दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढते आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. सर्व जिल्हा, राज्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. परदेशातून, तसेच दुसऱ्या राज्यातून आलेल्या नागरिकांनी स्वत: पुढाकार घेऊन प्रशासनाकडे नोंद करावी आणि होम क्वॉरेटाइनमध्ये राहावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून वारंवार देण्यात येत आहेत.

सविस्तर वाचा - पोलिस इन ऍक्‍शन मोड! रस्त्यावर फिरणाऱ्यांना चोप, उठाबशांचीही शिक्षा

मात्र, येथील तुकुम परिसरातील एका मशिदीमध्ये रशियातील तिर्किस्तानातील 11, दिल्ली, ओडिसा आणि केरळ येथील प्रत्येकी एक असे एकूण 14 व्यक्ती वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार रामनगर पोलिसांनी आज दुपारच्या सुमारास छापा टाकला आणि या व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांना वन अकादमी येथे होम क्वॉरेंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eleven foreigners are corona suspected