नागपूर उच्च न्यायालयाचा नवा कार्यक्रम जारी, असे आहे ३० जूनपर्यंतचे वेळापत्रक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जून 2020

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील कामकाजासाठी नवीन कार्यक्रम निश्‍चित करण्यात आला आहे. त्यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली. नवीन कार्यक्रम 30 जूनपर्यंत लागू असणार आहे. दरम्यान, अत्यावश्‍यक व ऍडमिशन श्रेणीतील प्रकरणांवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेतली जाईल. 

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील कामकाजासाठी नवीन कार्यक्रम निश्‍चित करण्यात आला आहे. त्यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली. नवीन कार्यक्रम 30 जूनपर्यंत लागू असणार आहे. दरम्यान, अत्यावश्‍यक व ऍडमिशन श्रेणीतील प्रकरणांवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेतली जाईल. 

नोटीसनुसार, 18 व 22 जून रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 या वेळेत न्यायमूर्ती विनय जोशी नियमित जामीन अर्ज, न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला अटकपूर्व जामीन अर्ज, 19 व 23 जून रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 या वेळेत न्यायमूर्ती सुनील शुक्रे व न्यायमूर्ती अनिल किलोर यांचे द्विसदस्यीय न्यायपीठ आणि न्यायमूर्ती रोहित देव यांचे एकल न्यायपीठ आपापल्या अधिकारातील अत्यावश्‍यक दिवाणी व ऍडमिशन श्रेणीतील प्रकरणे, दुपारी 2 ते 3.30 व दुपारी 3.45 ते सायंकाळी 5.15 या वेळेत न्यायमूर्ती झेड. ए. हक व न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांचे द्विसदस्यीय न्यायपीठ आणि न्यायमूर्ती नितीन सांबरे यांचे एकल न्यायपीठ आपापल्या अधिकारातील अत्यावश्‍यक फौजदारी व ऍडमिशन श्रेणीतील प्रकरणे, 25 व 29 जून रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 या वेळेत न्यायमूर्ती अविनाश घरोटे अत्यावश्‍यक नियमित जामीन अर्ज, न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर अत्यावश्‍यक अटकपूर्व जामीन अर्ज, 26 व 30 जून रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 या वेळेत न्यायमूर्ती रवी देशपांडे व न्यायमूर्ती अमित बोरकर यांचे द्विसदस्यीय न्यायपीठ आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांचे एकल न्यायपीठ हे आपापल्या अधिकारातील अत्यावश्‍यक दिवाणी व ऍडमिशन श्रेणीतील प्रकरणे तर, दुपारी 2 ते 30. व दुपारी 3.45 ते सायंकाळी 5.15 या वेळेत न्यायमूर्ती अतुल चांदूरकर व न्यायमूर्ती अनिल किलोर यांचे द्विसदस्यीय न्यायपीठ आणि न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांचे एकल न्यायपीठ आपापल्या अधिकारातील अत्यावश्‍यक फौजदारी व ऍडमिशन श्रेणीतील प्रकरणे ऐकतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: working schedule of nagpur high court released