किड्यांनी लावले यांना वेड, जंगलाशी यांचे अनोखे ऋणानुबंध

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

श्‍यामबाबू सोनी यांनी फाउंडेशनचे अभिनंदन केले. शिक्षकांचे कार्य ओळखून त्यांचा गौरव होणे कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. राकेश कुमार यांनी अध्यक्षीय भाषणातून ताजमहाल व अजंठा वेरूळ येथील लेण्यांच्या संशोधनाविषयी सांगितले. विशिष्ठ प्रजातीच्या किड्यांमुळे ताजमहालाचे नुकसान होत असून, यासंदर्भात प्रा. शेवडेंनी मार्गदर्शन करावे असे त्यांची सुचविले. संचालन रेखा दंडीगे घीया यांनी केले तर आभार डॉ. श्रीकांत तिडके यांनी मानले.

नागपूर : लोक मला वेडा म्हणतात, पण मी मात्र जंगलात स्वच्छंद फिरतो. मी एकटाच जातो पण एकटा कधीही नसतो, कारण जंगलात असंख्य किडे माझी वाट बघत असतात. त्यांचे अन्‌ माझे काय ऋणाणुबंध आहेत, देव जाणे. पण ते अलगद हातावर येऊन बसतात अन्‌ माझ्याशी संवाद साधतात. खरे बघता, इंग्रजीचा शिक्षक म्हणून शांतपणे निवृत्त झालो असतो, पण किड्यांनी मला वेड लावले अन्‌ मी जगावेगळ्या भ्रमंतीला निघालो आहे. मी वेगळ्याच विश्‍वात वावरतो आहे, अशी स्वत:च्या आयुष्याची प्रेरक कहाणी प्रा. आलोक शेवडे यांनी असंख्य प्रेक्षकांसमोर उलगडली.

अवश्य वाचा - दत्तात्रयनगरात दुहेरी हत्याकांड, मामा-भाचीची हत्या

डॉ. गिरीश गांधी फाउंडेशनचा स्व. धरणीधर गांधी स्मृती शिक्षक पुरस्कार किटकांचे अभ्यासक प्रा. आलोक शेवडे यांना माजी मंत्री डॉ. सतीश चतुर्वेदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निरीचे संचालक राकेश कुमार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माहेश्वरी समाजचे अध्यक्ष श्‍याम सोनी उपस्थित होते. तर व्यासपीठावर फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत तिडके, किशोर बुटले, धरणीधर गांधी यांच्या पत्नी तुलसीबाई गांधी, नरेंद्र गांधी व डॉ. प्रमोद गांधी उपस्थित होते. प्रा. आलोक शेवडे म्हणाले, बहिणीने दिलेल्या कॅमेऱ्याने किटकांचे छात्राचित्र काढण्याचे वेड लागले. त्यांची छायाचित्र काढताना मी हरवून जायचो, तो माझा छंद होता. किटकांचे छायाचित्रण करताना मी त्यांच्या सौंदर्य, स्वभाव व व्यक्‍तीमत्वाचा अभ्यास करण्यास सुरूवात केली. किटकांच्या जीवनात घडणारे बदल लोकांना सांगता असल्याचे प्रा. शेवडे म्हणाले.

श्‍यामबाबू सोनी यांनी फाउंडेशनचे अभिनंदन केले. शिक्षकांचे कार्य ओळखून त्यांचा गौरव होणे कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. राकेश कुमार यांनी अध्यक्षीय भाषणातून ताजमहाल व अजंठा वेरूळ येथील लेण्यांच्या संशोधनाविषयी सांगितले. विशिष्ठ प्रजातीच्या किड्यांमुळे ताजमहालाचे नुकसान होत असून, यासंदर्भात प्रा. शेवडेंनी मार्गदर्शन करावे असे त्यांची सुचविले. संचालन रेखा दंडीगे घीया यांनी केले तर आभार डॉ. श्रीकांत तिडके यांनी मानले.

सामाजिक जाणीवेच्या प्राध्यापकांचा सन्मान गरजेचा

चांगल्या व्यक्तीचा तिरस्कार अन्‌ वाईट माणसाचा सत्कार झाल्याचे अनेकदा घडले आहे. मात्र आदर्श शिक्षकच विद्यार्थ्यांच्या रूपाने देशाचे उज्वल भविष्य घडावित आहेत. अशात पर्यावरण रक्षणाची सामाजिक जाणीव असलेले प्राध्यापकांचा सन्मान गरजेचा असल्याचे डॉ. सतीश चतुर्वेदी यांनी केले.

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Worms, wildfire to the insects planted