यशोमती ठाकूर म्हणाल्या, महाराष्ट्राच्या लेकीचा जीवनाशी संघर्ष संपला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

पीडितेच्या मृत्यूनंतर दारोडा पसिरात संतप्त ग्रामस्थांनी नागपूर-हैदराबाद महामार्ग बंद पाडला. यामुळे दोन किमीपर्यंत वाहनांची रांग लागली होती. संतप्त नागरिकांनी रोष व्यक्‍त करीत आरोपीला ताब्यात देण्याची मागणी लावून धरली. आरोपीला शिक्षा झाली तरच मुलीच्या आत्म्याला शांती मिळले, अशी प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांसह गावकऱ्यांनी व्यक्‍त केली.

नागपूर : महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या वर्ध्यातील हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडितेचा सोमवारी सकाळी 6.55 निमिटांनी हृदयविकाराच्या झटका आल्याने मृत्यू झाला. सात दिवसांपासून तिची मृत्यूची झुंज सुरू होती. मात्र, दोन दिवसांपासून प्रकृती अधिकच खालावल्याने तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनीही या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. "माझ्यातली आई आज सुन्न, नि:शब्द झाली आहे. महाराष्ट्राच्या लेकीचा जीवनाशी संघर्ष संपला, आपण या "हिंसक-पुरुषी' मानसिकतेशी संघर्ष सुरू करूया,' असे आवाहन त्यांनी केले आहे. 

पीडितेच्या मृत्यूनंतर दारोडा पसिरात संतप्त ग्रामस्थांनी नागपूर-हैदराबाद महामार्ग बंद पाडला. यामुळे दोन किमीपर्यंत वाहनांची रांग लागली होती. संतप्त नागरिकांनी रोष व्यक्‍त करीत आरोपीला ताब्यात देण्याची मागणी लावून धरली. आरोपीला शिक्षा झाली तरच मुलीच्या आत्म्याला शांती मिळले, अशी प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांसह गावकऱ्यांनी व्यक्‍त केली. आग पीडितेच्या मृत्युमुळे राज्यभरात तणाव निर्माण झाला आहे.

कोणी सांगेल का? माझी काय चूक होती...

शाळा, महाविद्यालय व व्यापारी प्रतिष्ठानही बंद ठेवण्यात आली आहे. चौका-चौकात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. जवळपास तीनशे पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. संतप्त नागरिकांनी एकत्र येत नारोबाजी केली. अंकिताला न्याय मिळालाच पाहीजे, आरोपीला कठोर शिक्ष झाली पाहीजे, "जाळून टाका जाळून टाका' अशा घोषणा संतप्त नागरिक देत होते. 

अशात राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्विटरद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "माझ्यातली आई आज सुन्न, नि:शब्द झाली आहे. महाराष्ट्राच्या लेकीचा जीवनाशी संघर्ष संपला, आपण या "हिंसक-पुरुषी' मानसिकतेशी संघर्ष सुरू करूया,' असं आवाहन त्यांनी केले आहे. 

न्याय मिळाल्याशिवाय अंत्यसंस्कार नाही

सरकारकडून योग्य ती मदत व आरोपीला फाशी मिळणार नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, अशी प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांनी दिली होती. यांनतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फोन करून पीडितेच्या कुटुंबाचे सांत्वन केले आणि भावाला नोकशी देण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, संतप्त गावकऱ्यांनी न्याय मिळाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेतल्याने तणावात आणखीनच भर पडली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yashomati Thakur said, The struggle of the Maharashtra girl ended