पहाटे फिरायला गेले अन्‌ पाहतात तर काय मुलगा होता रक्‍ताच्या थारोळ्यात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 जानेवारी 2020

नागरिकांनी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला आणि माहिती दिली. बजाजनगर पोलिसांचे पथक घटनास्थही पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी मेडिकलमध्ये रवाना केला. पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

नागपूर : काचीपुऱ्यातील रहिवासी रघुनाथ पटेल हे रोज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जातात. नेहमीप्रमाणे ते शनिवारीही भल्या पाहाटे निघाले. काचीपुऱ्यापासून काही अंतर गाठताच त्यांना रक्‍ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह दिसला. कुणाचा मृतदेह आहे हे बघण्यासाठी त्यांनी जवळ जाऊन बघितले असता त्यांच्या पायाखालची जनीनच सरकली. पाहतात तर काय तो मृतदेह त्यांच्याच मुलाचा होता. हरीश रघुनाथ पटेल (वय 35, रा. काचीपुरा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी बजाजनगर पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल करून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे पाच वाजता रघुनाथ पटेल हे झोपेतून उठले आणि नेहमीप्रमाणे वॉकिंगसाठी जात होते. घरापासून काही अंतर दूर जाताच त्यांना एका युवकाचा मृतदेह रक्‍ताच्या थारोळ्यात दिसला. त्यांनी लगेच धाव घेतली. मृतदेह पाहताच त्याच्या पायीखालीच जमीन सरकली. स्वतःच्या मुलाचा मृतदेह असल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केल्यामुळे शेजारीही जमा झाले. 

महत्त्वाची बातमी - तुमची मुलगी वयात आली का? लक्ष द्या, तिच्यासोबत होऊ शकते असे काही...

नागरिकांनी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला आणि माहिती दिली. बजाजनगर पोलिसांचे पथक घटनास्थही पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी मेडिकलमध्ये रवाना केला. पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. दोन संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. खूनाचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: young boy murdered in Kachipura at Nagpur