दहावीच्या विद्यार्थिनीने घेतला गळफास 

सोमवार, 22 जून 2020

विशाखाने आपल्या बेडरूममध्ये स्लॅपच्या व्हेंटिलेटरच्या ग्रीलला ओढनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आई घरी आल्यानंतर तिला विशाखा दिसून आली नाही. तिला आवाज दिला असता बेडरूममधून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आईने बेडरूमचा दरवाजा ढकलला असता विशाखा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.

नागपूर : घरात कुणीही नसताना दहावीच्या विद्यार्थिनीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना अजनीत आज पहाटे उघडकीस आली. विशाखा हर्षल फुलझेले (वय 15, रा. फुलमती लेआउट, अजनी) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाखा ही दहावीची विद्यार्थिनी होती. तिचे वडील खासगी कंपनीत नोकरीवर आहेत तर आई गृहिणी आहे. रविवारी तिचे वडील बाहेर गेले होते तर आई शेजाऱ्यांकडे गेली होती. लहान बहिण बाहेर खेळत होती. यादरम्यान विशाखाने आपल्या बेडरूममध्ये स्लॅपच्या व्हेंटिलेटरच्या ग्रीलला ओढनीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

हृदयद्रावक घटना! आठ महिन्यांची गर्भवती गेली रुग्णालयातून पळून; भूमकाजवळ गेली असता झाला अंत
 

आई घरी आल्यानंतर तिला विशाखा दिसून आली नाही. तिला आवाज दिला असता बेडरूममधून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आईने बेडरूमचा दरवाजा ढकलला असता विशाखा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. या प्रकरणी अजनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. विशाखाच्या आत्महत्या कारण अद्याप कळू शकले नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young Girl Commit Suicide