esakal | प्रेमप्रकरणातून झाले भांडण अन् युवकाने उचलले हे पाऊल
sakal

बोलून बातमी शोधा

lover commits suicide in Kanhan river in Nagpur district

लग्नापूर्वीच्या प्रियकराला समजताच कशी बशी विवाहितेशी हितगुज साधण्यासाठी भेट घेतली. त्यांच्या भेटीगाठी होत होत्या. त्यांच्या भेटीची माहिती विवाहितेच्या घरच्यांना समजताच त्यांचा संताप अनावर झाला. चिडलेल्या कुटुंबीयांनी बादलला घरी बोलावले आणि मुलीपासून दूर राहण्याची तंबी दिली. यानंतर बादलने कन्हान नदीच्या पुलाखाली उडी घेऊन आत्महत्या केली. 

प्रेमप्रकरणातून झाले भांडण अन् युवकाने उचलले हे पाऊल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कामठी (जि. नागपूर) : जिल्हा नागपूर... तालुका कामठी... गाव कन्हान-पिपरी... दोन शेजारी... त्यांच्या मुला-मुलींमध्ये प्रेम झाले... पाच वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते... ही बाब मुलीच्या घरच्यांना समजताच वर्षभरापूर्वी दुसरीकडे लग्न लावून दिले... काही दिवसांसाठी विवाहिता माहेरी आली... मात्र, कोरोना व्हायरसमुळे देशात संचारबंदी लागू झाली अन्‌ अडकली... यानंतर प्रियकराने केले हे... 

जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्हान-पिपरी येथील रहिवासी बादल खंडसे याचे पाच वर्षांपासून शेजारीच राहणाऱ्या मुलीशी प्रेम होते. दोघेही प्रेमात आकंठ बुडाले होते. याचमुळे त्यांच्या भेटीगाठी वाढल्या होत्या. मात्र, त्यांच्या प्रेमाची कुणकूण मुलींच्या घरच्यांना लागली. मुलीच्या कुटुंबीयांचा त्यांच्या प्रेमसंबंधाला विरोध होता. त्यांनी दोघांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीही उपयोग झाला नाही. 

महत्त्वाची बातमी -  भयंकर! वीज पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

बदनामीच्या भीतीपोटी वर्षभरापूर्वी घरच्यांनी मुलीचे लग्न दुसऱ्या मुलाशी लावून दिली. दोघांचा सुखी संसार सुरू होता. माहेरची आठवण आल्यामुळे विवाहिता काही दिवस राहण्यासाई कन्हान-पिपरी येथे आली. आता सासरी परत जाणार तेवढ्यातच कोरोनामुळे देशात 21 दिवसांसाठी संचारबंदी लागू झाली. यामुळे विवाहिता माहेरीच अडकली. 

ही बाब तिच्या लग्नापूर्वीच्या प्रियकराला समजताच कशीबशी विवाहितेशी हितगुज साधण्यासाठी भेट घेतली. त्यांच्या भेटीगाठी होत होत्या. त्यांच्या भेटीची माहिती विवाहितेच्या घरच्यांना समजताच त्यांचा संताप अनावर झाला. चिडलेल्या कुटुंबीयांनी बादलला घरी बोलावले आणि मुलीपासून दूर राहण्याची तंबी दिली. यानंतर बादलने कन्हान नदीच्या पुलाखाली उडी घेऊन आत्महत्या केली. 

घटनेची माहिती मृताच्या नातेवाईकांना मिळताच घटनास्थळी गर्दी केली. यांनतर बादलला घेऊन नागपुरातील मेयो रुग्णालयात गेले. यावेळी डॉक्‍टरांनी बादलला मृत घोषित केले. मृताचा लहान भाऊ अभय राजू खडसे याच्या तक्रारीवरून जुनी कामठी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल पृथ्वीराज कराडे करीत आहेत. मृताच्या पाठीमागे आई, वडील, तीन भाऊ असा आप्तपरिवार आहे. 

जाणून घ्या - तू मला आवडली, माझ्याशी शारीरिक संबंध ठेव म्हणत करायचा हा प्रकार...

अपमान लागला जिवारी

लग्नापूर्वीची प्रेयसी माहेरी आल्याचे समजताच बादलने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. ही बाब विवाहितेच्या घरच्यांना समजताच त्यांनी बादलला घरी बोलावून घेतले. बादल घरी येताच मारहाण केली. सर्वांसमोर मारहाण झाल्याने बादलला अपमानीत झाल्यासारखे वाटले. त्याने रागाच्या भारात नजीकच्या कन्हान नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली.