Video : 'तो' बारमध्ये गेला अन्‌ बाहेर पडला, झाले असे अघटित... 

Young man murdered in front of Bar in Nagpur
Young man murdered in front of Bar in Nagpur

टेकाडी-कन्हान (जि. नागपूर) : नागपूर जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेच्या निवडणुकीचे वातावरण गरम असताना कन्हान परिसरातील आंबेडकर चौक येथील गौरव बारमध्ये क्षुल्लक कारणावरून चाकूने वार करून युवकाचा खून करण्यात आला. यामुळे निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील शेवटची सायंकाळ अत्यंत रक्तरंजित ठरली. 

संजय खडसे (वय 32, रा. सत्रापूर, कन्हान) हा शिवसेना नेते डॅनियल शेंडे यांचा लहान जावाई आहे. तो सोमवारी (ता. सहा) रात्री 10 वाजता गौरव बारमध्ये दारू पीत होता. दुसऱ्या टेबलवर काही युवक दारू पीत होते. एवढ्यात कुणाच्या तरी हातून दारूचा खाली ग्लास दुसऱ्या टेबलवरील युवकाच्या पायावर पडला. यामुळे बाचाबाची झाली. एकाने ही गोष्ट संजयला सांगितली. संजयने युवकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसऱ्या गटातील युवकांनी शिवीगाळ केली. तसेच पाहून घेऊ असे म्हणत बारच्या बाहेर पडले.

क्षुल्लक कारणावरून युवक आपल्याला मारतील असा विचार संजयने के लाही नसेल. तो घरी जाण्यासाठी बारच्या बाहेर निघाला. यावेळी लपून बसलेल्या आरोपींनी संजयवर चाकूने सपासप चार ते पाच वार केले. संजयला काही समजलेही नाही. संजय रक्‍ताच्या थारोळ्यात कोसळला व मदतीसाठी आरडाओरडा करीत होता. यावेळी बिअर बारमधील कर्मचारी व मालक काठी घेऊन बाहेर आले. त्यांना पाहताच आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. 

काही युवकांना अटक

संजय खडसे याचा मृत्यू झाल्याचे समजून बार मालकाने पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधीकारी संजय पुज्जलवार व पोलिस निरीक्षक चंद्रकांत काळे पोहोचले. संजय खडसे याला उपचारासाठी रुग्णालयात हलवले व आरोपींची सीसीटीव्हीचा सहाय्याने ओळख पटवून शोध सुरू केला. सकाळपर्यंत कन्हान पोलिसांनी काही युवकांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. 

बॉटल, दगडानेही वार

बारच्या बाहेर चाकूने संजयवर हल्ला केल्यानंतर डोक्‍यावर बॉटल व दगडाने मारले. संजयला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून मरेकरांनी घटना स्थळावरून पळ काढला. संजयला कामठी उपजिल्हा रुग्णालयात ठेले असता डॉक्‍टरांनी मृत घोषित केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com