नागपुरातील कथावाचक युवतीवर वृंदावनमध्ये महंतने केला बलात्कार

Thursday, 29 October 2020

पीडित २५ वर्षीय युवा कथावाचक युवती प्रभावती (बदललेले नाव) ही नागपुरात राहते. गेल्या १० वर्षांपासून ती कथावाचनासाठी देशभरात जाते. जून महिन्यात फेसबूकवरून तिची ओळख उत्तरप्रदेशातील मथुरेतील एका आश्रमात महंत आणि पुजारी असलेल्या दिनबंधू दास महाराज (वय ४०, वृंदावन, उत्तरप्रदेश) याच्याशी झाली. 

नागपूर : नागपुरातील कथावाचक युवतीवर वृंदावनमधील आश्रमाच्या एका महंतने पूजा-विधी शिकविण्याच्या नावावर बलात्कार केला. या प्रकरणी नागपुरातील तहसील पोलिस ठाण्यात युवतीच्या तक्रारीवरून महंताविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. महंत दिनबंधू दास असे आरोपी पुजाऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २५ वर्षीय युवा कथावाचक युवती प्रभावती (बदललेले नाव) ही नागपुरात राहते. गेल्या १० वर्षांपासून ती कथावाचनासाठी देशभरात जाते. जून महिन्यात फेसबूकवरून तिची ओळख उत्तरप्रदेशातील मथुरेतील एका आश्रमात महंत आणि पुजारी असलेल्या दिनबंधू दास महाराज (वय ४०, वृंदावन, उत्तरप्रदेश) याच्याशी झाली. 

दोघांची एकमेकांसोबत मैत्री झाली. दिनबंधू याने प्रभावतीला फेसबुक मॅसेंजरवरून कॉल करणे सुरू केले. त्याने प्रभावतीला वॉट्सॲप नंबर मागितला. दोघांचा चॅटिंग सुरू होती. दरम्यान प्रभावतीने मातीची भांडी बनविण्याचे काम करीत असल्याचे दिनबंधूला सांगितले. त्याने आश्रमात मातीची भांडी ठेवण्यासाठी मागणी केली. 

हेही वाचा - ‘मला कोरोना झाला असून, लास्ट स्टेजवर आहे’ असे म्हणत केला विश्वासघात
 

प्रभावती हिला संस्कृतमध्ये आचार्य पदवी प्राप्त करायची होती. नातेवाईकाच्या शिफारशीवरून तिने वृंदावन येथील एका संस्कृत महाविद्यालयात प्रवेश घेतला. ५ ऑक्टोबरला ती आपल्या आईसोबत वृंदावनला गेली. वृंदावनमध्ये दिनबंधू दास यानेच त्यांची आश्रमात राहण्याची व्यवस्था केली. 

६ ऑक्टोबरला दिनबंधू दासच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर रात्री ९ वाजता ती आपल्या आईसोबत आश्रमात आली. ८ ऑक्टोबरला रात्री बारा वाजता दिनबंधूने पूजा-विधी शिकविण्याचा बहाणा सांगून कथावाचिकेला खोलीत बोलावले. दिनबंधूने प्रभावतीला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देताच तिच्यावर बलात्कार केला.

मामाने दिला धीर

दिनबंधूने केलेल्या कृत्यामुळे प्रभावती नैराश्‍यात गेली. तिने मामाला अत्याचाराची माहिती दिली. तिला धीर देत ही बाब कुटुंबीयांना सांगितली. त्यांनी मंगळवारी (ता. २७) तहसील पोलिस ठाणे गाठले. कथा वाचिकेच्या तक्रारीवर तहसील पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद केली. घटनास्थळ वृंदावन असल्याने संबंधित कारवाईची कागदपत्रे वृंदावन येथील कोतवाली ठाण्यात पाठविण्यात आली आहेत.

लग्नाचे दिले आमिष

दिनबंधू महाराजाने बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची कबुली तिच्या मामाकडे दिली. त्याने प्रभावतीला लग्न करण्याचे आमिष दिले. लग्न करणार असल्यामुळे ती पुन्हा वृंदावनला गेली असता दिनबंधू महाराज आश्रम सोडून पळाला होता. लग्नाच्या भीतीमुळे पळाल्याची माहिती मिळताच तिने पोलिसात तक्रार केली. 

संपादन  : अतुल मांगे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: young woman from Nagpur was tortured by a mahant in Vrindavan