"टिकटॉक'वर पुन्हा बंदी घाला... "चॅलेंज' ठरतेय धोकादायक!

अनिल कांबळे
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

सध्या युवा पीढी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. फेसबुक, वॉट्‌सऍप, इंस्टाग्राम, ट्विटर, लाईकी ऍप, हलो ऍप आणि टिकटॉक हे ऍप्स तर जवळपास प्रत्येकाच्याच मोबाईलमध्ये असतात. महाविद्यालयीन युवक आणि युवतींना मनोरंजनाचे साधन म्हणून टिकटॉक ऍपवर व्हिडिओ बनवणे, चॅलेंज स्वीकारणे, डॉयलॉगवर ऍक्‍टिंग करणे किंवा हिंदी-मराठी चित्रपटातील गितांवर हावभाव करून व्हिडिओ बनविण्यावर भर असतो.

नागपूर :  ब्ल्यू व्हेल आणि पब्जीनंतर आता "टिकटॉक' ऍप युवा पिढीसाठी धोकादायक ठरत आहे. टिकटॉकवरील वेगवेगळे "चॅलेंज' जीवघेणे ठरत असून, आतापर्यंत काही युवकांच्या जीवावर बेतले आहेत. काहींना अपंगत्व आल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे.

अवश्य वाचा - शेतक-यांनो तुम्हाला सोडणार नाही! मी पुन्हा येईन...

सध्या युवा पीढी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. फेसबुक, वॉट्‌सऍप, इंस्टाग्राम, ट्विटर, लाईकी ऍप, हलो ऍप आणि टिकटॉक हे ऍप्स तर जवळपास प्रत्येकाच्याच मोबाईलमध्ये असतात. महाविद्यालयीन युवक आणि युवतींना मनोरंजनाचे साधन म्हणून टिकटॉक ऍपवर व्हिडिओ बनवणे, चॅलेंज स्वीकारणे, डॉयलॉगवर ऍक्‍टिंग करणे किंवा हिंदी-मराठी चित्रपटातील गितांवर हावभाव करून व्हिडिओ बनविण्यावर भर असतो.

अनेक युवक-युवती "ये कर के बतावो' किंवा टिकटॉक चॅलेंज अशा टॅगलाईन खाली व्हिडिओ बनवितात. ते ऍप्सवर अपलोड करून तसेच व्हिडीओ बनविण्याचे चॅलेंज केले जाते. अनेक व्हिडिओमध्ये कठीण चॅलेंज दिले जाते. इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून उडी मारणे, उलटी उडी मारणे, मानेच्या भारावर उडी मारणे, खड्ड्यातून बाहेर पडणे किंवा झाडावरून उडी घेणे अशा व्हिडिओंचा समावेश असतो. अनेक युर्जस तसेच व्हिडिओ बनविण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. असे व्हिडिओ बनविताना हात-पाय मोडून घेतात. तर अनेक जण गंभीर स्वरुपात जखमी होतात. तरीही चॅलेंज पूर्ण करण्यासाठी युवकांची धडपड सुरू असते.

दुचाकी "स्टंट' चॅलेंज

दुचाकीचे स्टंट करणाऱ्या व्हिडिओंना टिकटॉकवर खूप "लाईक्‍स' किंवा "हार्ट' मिळतात. अशा युवकांच्या आयडीवर अनेक फ्रेंड्‌ससुद्धा असतात तर कमेंट बॉक्‍सही फुल्ल असतो. मात्र, चॅलेंज स्वीकारणारे युजर्स व्हिडिओ बनविताना अनेकदा दुचाकीसह पडतात तर कधी-कधी दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

टिकटॉक बंदीची मागणी

मोबाईलवरील "टिकटॉक' ऍपच्या व्यसनामुळे लहान मुले, मुली आणि तरुणांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम होत आहे. या "ऍप'मुळे राज्यातील घराघरांमध्ये तरुणांच्या मानसिकतेवर विपरित परिणाम होत आहे. तसेच कौटुंबिक स्वास्थ्य बिघडत आहे. त्यामुळे या ऍपवर बंदी घालावी, अशी मागणीही मोठ्या प्रमाणात जोर धरत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth Bizzy on tiktok for video creation