केशकर्तन व्यवसाय बंद असल्यामुळे शेतावर गेला, अन्‌ काळही होता "त्याच्या' प्रतीक्षेत.

 पारशिवनी ः याच रोटावेटर खाली चिरडला गेला शंकर.
पारशिवनी ः याच रोटावेटर खाली चिरडला गेला शंकर.

पारशिवनी (जि.नागपूर):  सदया कोरोनाच्या आक्रमणाने सा-यांचे पारंपरिक धंदे चौपट झाले. दीड महिन्यांपासून ग्रामस्थ लॉकडाउनमध्ये आहेत. कटींग व्यवसाय बंद असल्यामुळे शंकर शिवाजी वानकर (वय25, पटगोवारी) या तरूणाने शेतावर जाउन काम करण्याचा निश्‍चय केला. नयाकुंड येथील शेत शिवारात दुपारी शेतात ट्रॅक्‍टरवरील रोटावेटरने शेतात काम करीत असताना अचानक शंकरचा रोटावेटरखाली चिरडून दुपारी तीनच्या सुमारास जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.


शंकरचा केसकर्तनाचा होता व्यवसाय
नयाकुंड आमडी मार्गावरील शेतात दुपारी ट्रॅक्‍टरने रोटावेटरचे काम सुरू असताना अचानक शंकर हा रोटावेटरमध्ये सापडल्याने त्याच्या जागीच मृत्यू झाला. शंकर हा केसकर्तनाचा व्यवसाय करीत होता. तसेच त्याचे दुकान पारशिवनीला होते. पण लॉकडाउन असल्याने दुकान बंद असल्याने शंकर हा गावोगावी जाउन कटिंग दांडी करायचा. आज तो नयाकुंडला आला होता. शेतात चालकासोबत ट्रॅक्‍टरवर शेतात गेला. दुपारी काम करीत असताना रोटावेटरमध्ये सापडल्याने तो त्यात चिरडला गेल्याने त्याचा मृत्यू झाला. घटना घडताच ट्रॅक्‍टरचालक घटनास्थळावरून पसार झाला. शेतालगत असलेल्या शेतक-यांना घटनेची माहिती मिळताच वार्ता वा-यासारखी गावात पसरली.

आरोपीला पकडा, तेव्हाच मृतदेहाला हात लावा !
गावक-यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पारशिवनी पोलिसांना घटनेची माहीती मिळताच ते मृतदेह ताब्यात घेण्यास गेले असता मृतदेह उचलण्यास नातेवाइकांनी मनाई केली. आधी आरोपीला अटक करा, अशी मागणी गावक-यांनी केली. बराच वेळ मृतदेह शेतात पडून होता. पोलिसही नातेवाईकांना समजाविण्याचा प्रयत्न करीत होते. पाहता पाहता हजारो बघ्यांची गर्दी घटनास्थळी जमली. घटनेचे गांभीर्य ओळखून पारशिवनी पोलिसांनी अधिकची कुमक बोलावून घेतली व कुठलीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी बंदोबस्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com