
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचे अधिकारी अनिल वाळके यांना ५० हजारांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. एका कर्मचाऱ्याचा पगार १०० टक्के करण्यासाठी त्यांनी ही लाच घेतली.
नागपूर : गेल्या आठ महिन्यांत दोन विभागप्रमुख भ्रष्टाचाराच्या प्रकरणात एसीबीच्या जाळ्यात अडकले. विशेष म्हणजे दोन्ही अधिकारी कुंभेजकरांच्या काळात अकडले. यामुळे ते चांगलेच संतापले असून भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, असे खडे बोल विभागप्रमुखांना सुनावले.
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचे अधिकारी अनिल वाळके यांना ५० हजारांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. एका कर्मचाऱ्याचा पगार १०० टक्के करण्यासाठी त्यांनी ही लाच घेतली. विशेष म्हणजे गेल्या आठ महिन्यांपासून त्याची फाईल प्रलंबित होती.
हेही वाचा - धक्कादायक! मतमोजणी सुरू असतानाच सख्ख्या चुलत भावाने केला चाकू हल्ला
फायलींच्या फिरण्याचा क्रम ऑनलाइन करण्याचा दावा करण्यात येत असून आठवडाभरापेक्षा जास्त काळ फाईल प्रलंबित असल्यास त्याचे स्पष्टीकरण द्यायचे आहे. विशेष म्हणजे फाईन प्रलंबित ठेवण्याच्या कारणावरून ७-८ कर्मचाऱ्यांची एक वेतनवाढ रोखण्यात आली. असे असताना फाईल आठ महिने पडून असताना आश्चर्य व्यक्त करण्यात आहे. यापूर्वी पाणी पुरवठी विभागाचे कार्यकारी अभियंता विजय टाकळीकर यांना एसीबीच्या पथकाने अटक केली होती.
दोन्ही अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या कार्यालयातच अटक करण्यात आली. यामुळे जिल्हा परिषदची प्रतीमा मलिन होत आहे. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी नाराजी व्यक्त केली. विभागप्रमुखांनी भ्रष्टाचार व गैरव्यवहारावर उपदेशाचे डोजही दिले. परंतु हे डोज अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी नवीन नाही. त्यामुळे या प्रकारावर आळा घालण्यात, त्यांनी किती यश येते, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
संपादन ः अतुल मांगे