वर्धेतील युवकाने तयार केली टचलेस हॅण्ड सॅनिटायझर मशीन 

ouchless hand sanitizer machine made by a youth from Wardha.
ouchless hand sanitizer machine made by a youth from Wardha.
Updated on

वर्धा : शहरातील आर्वी नाका येथील राहुल खाडे नामक युवकाने "टचलेस हॅण्ड सॅनिटायझर मशीन' बनविली आहे. ही मशीन एखाद्या संशोधनापेक्षा कमी नाही. राहुलने ही मशीन प्रशासनाला भेट दिली. उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी राहुलने बनविलेल्या मशीनची प्रशंसा करीत प्रोत्साहन दिले. 

राहुल नरेंद्र खडे (वय 30) या युवकाने पॉलिटेक्‍निकचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वत:चा वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय सुरू केला. त्याला इलेक्‍ट्रॉनिक्‍समध्ये नवनवीन प्रयोग करण्याची आवड आहे. देशभरात कोरोनाचे संकट आले असताना यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना हात सॅनिटाईज करण्यासह वारंवार धुण्यास सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर राहुलने ऑटोमॅटिक हॅण्ड सॅनिटायझर मशीन बनविण्याचा निश्‍चय केला. 

आरो फिल्टरच्या कॅबिनेटच्या साहाय्याने त्याने निर्माणकार्य सुरू केले. बाजारातून इलेक्‍ट्रिक पंप, नोजल, चार्जर, एसएमपीएस, स्वीच, एलईडी इन्डीकेटर विकत घेतले. सर्व वस्तूंना जोडून ही मशीन बनविली. उल्लेखनीय असे की, सेन्सरच्या साहाय्याने हॅण्ड सॅनिटायझर मशीन बनविण्यात आली आहे. ही मशीन तयार करण्यासाठी राहुलला पंधरा दिवसांचा कालावधी लागला. कोणत्याही वस्तूला स्पर्श न करता आपण हात सॅनिटाईज करू शकतो, अशी माहिती राहुल खाडे याने दिली. 

"मेड इन वर्धा' असे संबोधत प्रशंसा 

ही मशीन प्रशासनाला भेट देण्याची इच्छा राहुलने व्यक्त केली. उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांच्या उपस्थितीत ही मशीन प्रशासनाला भेट देण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी स्वाती ईसाये व इतर कर्मचारी उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी राहुलने बनविलेल्या मशीनला "मेड इन वर्धा' असे संबोधत प्रशंसा केली. सोबतच आणखी काही मशीन बनविण्यासाठी राहुलला प्रोत्साहित केले. राहुलच्या नावीन्यपूर्ण प्रयोगाची प्रशंसा केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com