कुणीही उपाशी राहू नये यासाठी शिवभोजनात मिळते...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 April 2020

कोरोनामुळे सर्व कामधंदे बंद पडल्याने अशा गरीब-गरजूंना शासनाने कुणीही उपाशी राहू नये यासाठी सुरुवातीला जिल्हाठिकाणी शिवभोजन अंतर्गत पाच रुपयामध्ये एक भोजन थाळी सुरू केली. त्यांनतर ती प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सुरू केली.

तेल्हारा (जि. अकोला) : कोरोनामुळे सर्व कामधंदे बंद पडल्याने अशा गरीब-गरजूंना शासनाने कुणीही उपाशी राहू नये यासाठी सुरुवातीला जिल्हाठिकाणी शिवभोजन अंतर्गत पाच रुपयामध्ये एक भोजन थाळी सुरू केली. त्यांनतर ती प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सुरू केली.

नियम पाळून केले उद्‍घाटन

अनुषंगाने तेल्हारा शहरात सुद्धा १ एप्रिलपासून शिवभोजन थाळीचे उद्‍घाटन तहसीलदार राजेश सुरडकर, नगराध्यक्ष जयश्री पुंडकर, मुख्याधिकारी मनोहर अकोटकर, ठाणेदार विकास देवरे यांच्या उपस्थितीत शेगाव नाका स्थित सुरुची भोजनालय येथे करण्यात आले. त्याचा फायदा शहरासह लगतच्या खेड्यातील गरीब-गरजूंना झाला असून, त्यामुळे लॉकडाउनच्या काळात काम गेले. परंतु, शासनाने जेवणाची व्यवस्था केल्याचे आम्ही जीवन जगत असल्याचे त्यांनी सांगितले. याचा फायद दर दिवसाला सरासरी १५० ते २०० नागरिक घेत आहेत. त्यामुळे जवळपास एक क्विंटलच्या अन्नातून शिवभोजनचा लाभ गरीब-गरजूंना होत आहे.

हेही वाचा- शेतकरी राजा... घे स्वतःची काळजी

असे आहे शिवभोजन थाळीचे स्वरूप
150 ग्राम तांदूळ
100 ग्राम भाजी
100 ग्राम वरण
60 ग्राम दोन गहू पोळ्या
एकूण 410 ग्राम जेवण थाळी

क्लिक करा- खबरदार...कोणत्याही परिस्थितीत बी-बियाणे भेटलीच पाहिजेत

गरजूंना होत आहे फायदा
शासनाच्या नियमाप्रमाणे त्याचे ऑनलाइन मोबाईल ॲपवर फोटो घेऊन सर्व सुरक्षितता पाळून शिवभोजन थाळीचे वाटप वेळेत सुरू आहे. त्याचा फायदा गरजूंनाच होत आहे.
-प्रमोद भटकर, संचालक शिवभोजन, सुरुची भोजनालय

कुणीही उपाशी पोटी राहत नाही
शिवभोजन सुरू केल्याने शहरासह जवळपासच्या अनेक गरीब-नागरिकांना त्याचा फायदा झाला आहे. कुणीही उपाशी पोटी राहले नाही याचे समाधान आहे. हेच शासनाचे धोरण आहे. त्यामुळे गरजूंनी जाऊन शिवभोजनाचा लाभ घ्यावा.
-राजेश सुरडकर, तहसीलदार, तेल्हारा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ‘Shivbhojana’ provides fresh food every day in akola