Declared Dead Funeral Ready
esakal
जगदीश सांगोडे
रामटेक : घरात शांतता होती... जणू काळही थांबून उभा होता. अंगणात शोकमंडप उभा राहिला, खुर्च्या मांडल्या गेल्या, अंत्यविधीचे साहित्य कोपऱ्यात ठेवले गेले. एका कोपऱ्यात पांढऱ्या वस्त्रात निश्चल पडलेले शरीर आणि दुसऱ्या कोपऱ्यात डोळे पुसत उभे असलेले नातेवाईक. सोशल मीडियावर निधनाच्या बातम्या झळकत होत्या, दूरदूरचे नातेवाईक अंत्यविधीसाठी निघाले होते. पण नियतीला काहीतरी वेगळेच लिहायचे होते. अंत्यसंस्काराच्या तयारीत असतानाच, अचानक गंगाबाईंच्या निश्चल पायाची बोटे हलली आणि मृत वृद्धा जिवंत झाल्याचे समजताच क्षणात शोकाकुल कुटुंब आश्चर्य आणि थराराने आनंदून गेले.