चिंताजनक : विदर्भातील या जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचे अर्धशतक

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 May 2020

मागील काही दिवसापासून अकोला शहरात लगतच्या काही खेड्यापर्यंत ही कोरोना जाऊन पोहोचला आहे.

अकोला : अकोल्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे अशातच मंगळवारी प्राप्त झालेले एकूण बत्तीस अहवालापैकी तब्बल 11 अहवाल पॉझिटिव्ह आले असून आता अकोल्यात एकूण पॉझिटिव्ह अहवाल येण्याची संख्या 75 झाली असून, सध्याच्या घडीला पंचावन्न रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.

मागील काही दिवसापासून अकोला शहरात लगतच्या काही खेड्यापर्यंत ही कोरोना जाऊन पोहोचला आहे. आढळत असलेले कोरोना पॉझिटिव हे ठराविक परिसरातील असून ते पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्यानेच बाधित झाले असल्याचा खुलासा प्रशासनाने केला आहे मात्र अद्यापही कम्युनिटी स्प्रेड झाला नसल्याचे सांगण्यास ते विसरले नाहीत.

हेही वाचा - Lockdown : अॅड.प्रकाश आंबेकडरांनी शेतकऱ्यांसाठी केली ही महत्त्वाची मागणी

मंगळवारी एकूण 32 अहवाल प्राप्त झाले त्यामध्ये 11 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर एकविसावा निगेटिव्ह आले आहेत. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांपैकी चार जण मोहम्मद अली  रोड येथील तर उर्वरित पैकी दोन जण बैदपुरा, आणि बाकीचे गुलजारपुरा, पिंजर,खंगनपुरा, कृषी नगर,ताजनगर येथील रहिवासी आहेत.

आवश्यक वाचा - धक्कादायक! देशी-विदेशी बंद असल्याने लोकांचा गावठी दारूवर होताा जोर अन् दारू विक्रेत्यालाच झाला कोरोना

ग्रामीण भागाकडे कोरोना आगेकूच
सोमवारी अंत्री बाळापुर येथे एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला होता त्याच्यानंतर मंगळवारी मध्ये आज प्राप्त झालेल्या अहवालात एक रुग्ण हा बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथील रहिवासी असल्याचे नमूद करण्यात आले आहे तेव्हा अकोला शहरानंतर कोरोना ने ग्रामीण भाग आपल्या विळख्यात ओढण्यास सुरुवात केली आहे

पिंजर सील करण्याची प्रक्रिया सुरू
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पिंजर मध्ये आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात आणले जात असून पिंजर हे गाव सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

अशी आहे सद्यस्थिती
पॉझिटिव्ह अहवाल 75
अॅक्टिव्ह रूग्ण 55
मृत्यू 6
आत्महत्या 1
पूर्णपणे बरे झालेले 13


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11 patient report corona positive in akola district