धक्कादायक! देशी-विदेशी बंद असल्याने; लोकांचा गावठी दारूवर होता जोर अन् दारू विक्रेत्यालाच झाला कोरोना

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 May 2020

बाळापूर तालुक्यातील अंत्री (मलकापूर) येथील रुग्णाचाा भाऊ हा अकोल्यातील जुने शहरातील एका पॉझिटिव्ह डॉक्टरच्या दवाखान्यात 24 ते 29 दरम्यान उपचारार्थ दाखल होता. आज आढळून आलेला रुग्ण हा त्यावेळी त्याच्या भावासोबत दवाखान्यातच होता. त्यानंतर 28 एप्रिल रोजी कोरोना विषाणूची लागण झालेल्या एका महीलेचा मृत्यू झाला होता.

बाळापूर (जि. अकोला) : कोरोना विषाणूने अकोला शहरात थैमान घातले असून, आता बाळापूर तालुक्यातील अंत्री (मलकापूर) गावात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली. सोमवारी पॉझिटिव्ह आढळून आलेल्या या रुग्णाचाा भाऊ हा अकोल्यातील जुने शहरातील एका कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टरच्या दवाखान्यात उपचार घेत होता. या डॉक्टरच्या संंपर्कात असलेल्या अंत्री येथील पाच जणांना तातडीने अकोला रुग्णालयात रवाना करून त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. सोमवारी पाच पैकी दोघांचा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर एका रुग्णाचा अहवाल नकारात्मक तर एकाचा सकारात्मक आला आहे. व इतर तिघांचे तपासणी अहवाल प्रलंबित आहेत. 

क्लिक करा- अकोला ब्रेकिंग : गाव-खेड्यातही पोहचला कोरोना

रुग्णाचा भाऊ अकोल्यातील पोझिटिव्ह डॉक्टरच्या संपर्कात होता
बाळापूर तालुक्यातील अंत्री (मलकापूर) येथील रुग्णाचाा भाऊ हा अकोल्यातील जुने शहरातील एका पॉझिटिव्ह डॉक्टरच्या दवाखान्यात 24 ते 29 दरम्यान उपचारार्थ दाखल होता. आज आढळून आलेला रुग्ण हा त्यावेळी त्याच्या भावासोबत दवाखान्यातच होता. त्यानंतर 28 एप्रिल रोजी कोरोना विषाणूची लागण झालेल्या एका महीलेचा मृत्यू झाला होता. या महिलेच्या संपर्कात आलेल्या या डॉक्टरलाही कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समजताच दवाखान्यात दाखल असलेल्या अंत्री मलकापूर येथील रुग्णाच्या परिवारातील पाच जणांना तपासणीसाठी अकोला येथे पाठविण्यात आले होते. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेतले असता सोमवारी पाच पैकी दोघांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून, एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्या अनुशंगाने अंत्री येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक दाखल झाले आहे.

हेही वाचा- वृद्ध दाम्पत्याच्या इच्छा शक्तीला सलाम
 
बाळापूर तालुक्यातिल पहिला रुग्ण 

गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनामार्फत अंत्री गाव सिल करण्यात आले आहे. त्या ठिकाणी आरोग्य अधिकारी, पोलिस, ग्रामपंचायत, डॉक्टरांचे पथक तैनात आहे. गाव निजर्तुंकीकरण करण्यात आले आहे. सदरचा रुग्ण गावात कोणात्या नागरिकांच्या संपर्कात आला होता. याचा तपास करण्याचे आवाहन पोलिस आणि आरोग्य यंत्रणोला पार करावे लागणार आहे.

28 जणांना घेतले ताब्यात 
सोमवारी पॉझिटिव्ह आढळून आलेला रुग्ण हा गावात गावठी दारू गाळण्याचे काम करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, याच्या संपर्कात आलेल्या एकूण 30 जणांना सोमवारी अकोला येथील वैद्यकीय पथकाने तपासणीसाठी ताब्यात घेतले असून, कोरोना विलगीकरण कक्षात दाखल केले असल्याचे तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी सांगितले आहे. यामध्ये एका डाॅक्टरसह आरोग्य सेवकाचाही समावेश असून, या दोघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. अंत्री हे गाव पूर्णतः सिल केले असून, उरळ ठाणेदार विलास पाटील हे लक्ष ठेवून आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola In Balapur taluka The first patient with the corona virus was found