उन्हाळ्याच्या तडाख्यात कुलरचा झटका अन् घडली हृदयद्रावक घटना

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 April 2020

उन्हाळ्याची चाहूल लागताच सर्वत्र एसी, पंखे, कुलर लावण्याची प्रक्रियेला सुरुवात होते. थंडी हवा मिळावी म्हणून सर्वांची धावपळ असते. कुलर, एसी, पंखे लावताना किंवा त्याची दुरुस्ती करताना काळजी घेणेही मोठी जबाबदारी असते. थोडीही लापरवाई केल्याने अनेकवेळा अपघाताच्या घटना घडल्या. आणि अनेकांनी आपला जीव गमावला आहे.

हिवरखेड (जि. अकोला) : उन्हाळ्याची चाहूल लागताच सर्वत्र एसी, पंखे, कुलर लावण्याची प्रक्रियेला सुरुवात होते. थंडी हवा मिळावी म्हणून सर्वांची धावपळ असते. कुलर, एसी, पंखे लावताना किंवा त्याची दुरुस्ती करताना काळजी घेणेही मोठी जबाबदारी असते. थोडीही लापरवाई केल्याने अनेकवेळा अपघाताच्या घटना घडल्या. आणि अनेकांनी आपला जीव गमावला आहे.

क्लिक करा- अक्षय्य तृतीयेला चिंचोणीला हे विशेष महत्त्व...वाचा 

शॉक लागल्याने झाला मृत्यू
तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आकोली रुपराव येथील 11 वर्षीय मुलाचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता.24) रात्रीला घडली. तालुक्यातील आकोली रुपराव येथील सधन शेतकरी लक्ष्मनराव इंगळे यांचा पाचव्या वर्गात शिकणारा मुलगा अजय इंगळे (वय 11) हा शुक्रवारी (ता.24) रात्री नऊ वाजता घरातील कुलर चालू करण्यासाठी गेला असता, अजयला शॉक लागल्याने त्याला तेल्हारा येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासणीअंती मृत घोषित केले. अजय हा एकूलता-एक मुलगा होता. त्याच्या अकस्मिक मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11-year-old boy dies of shock

Tags
टॉपिकस
Topic Tags: