तिरवंजामधील कोंबड बाजारावर छापा; ११ जणांना अटक, १३ लाखांचा मुद्देमाल जप्त

13 lakh rupees seized from illegal cock selling in ekatanagar of chandrapur
13 lakh rupees seized from illegal cock selling in ekatanagar of chandrapur

एकतानगर (जि. चंद्रपूर): तालुक्‍यातील तिरवंजा येथे अवैधरित्या सुरू असलेल्या कोंबड बाजारावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी ११ जणांना अटक करून त्यांच्याकडून 13 लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी (ता. 27) करण्यात आली.

तिरवंजा येथील वनराई परिसरात अवैधरित्या कोंबड बाजार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस त्यांच्यावर पाळत ठेवून होते. कोंबड बाजार सुरू असल्याच्या माहितीवरून पोलिसांना छापा टाकला. यावेळी विजय गुलाब महाजन (वय 42), सुदाम देवराव निमकर (वय 35), अमित प्रभाकर हेमके (वय 31), प्रतीक दीपक हजारे (वय 25), दिनेश रामदास लांजेकर (वय 47, सर्व राहणार चंद्रपूर), प्रशांत अजय मंत्रीवार (वय 21, रा. दुर्गापूर), संजय हनुमान सुमटकर (वय 30, रा. कवठी), शंकर अशोक येरगुडे (वय 25, रा. तिरवंजा), ज्ञानेश्वर रामदास वनसिंग (वय 22), आनंदराव किशोर झाडे (वय 40, दोघेही रा. छोटा नागपूर), राजेश गजानन वाढई (वय 30, रा. ऊर्जानगर) हे सर्वजण पैशाची बाजी लावून जुगार खेळताना आढळून आले.

यावेळी पोलिसांनी ११ जणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम, दुचाकी, चारचाकी वाहन, असा एकूण 13 लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस निरीक्षक सुनीलसिंग पवार यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेषण विभाग प्रमुख अमोल तुळवार, केशव चिटगिरे, हेमराज प्रधान, शशांक पदामवार यांच्या पथकाने केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com