Water Safety : होळी खेळल्यानंतर अंघोळीला गेलेल्या १४ वर्षीय बालकाचा डोहात बुडून मृत्यू झाला. सोबत असलेला मित्र जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
आर्वी : रंग खेळून झाल्यावर नाल्यावर अंघोळीस गेलेल्या एका बालकाचा मृत्यू झाला तर दुसरा नाका तोंडात पाणी गेल्यामुळे जखमी झाला. त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .ही घटना रंगपंचमीच्या दिवशी (ता.१४) रोजी दुपारी घडली.