esakal | COVID19 : या जिल्ह्यातील 16 अहवाल प्रलंबीत, अ‍ॅक्टीव रुग्णसंख्या सहा
sakal

बोलून बातमी शोधा

corona negative in washim.jpg

देशासह राज्यभरात दिवसेंदिवस कोरोनाची संख्या वाढत आहे. त्यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात वेळीच कठोर पावले उचलली. शासनाने घालून दिलेल्या दिशा, निर्देशांचे तंतोतंत पालन केले.

COVID19 : या जिल्ह्यातील 16 अहवाल प्रलंबीत, अ‍ॅक्टीव रुग्णसंख्या सहा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाशीम : जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून गेल्या काही दिवसांत स्वॅब नमुने तपासणीस पाठविण्याची संख्या वाढली आहे. यामध्ये प्रामुख्याने कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील, कोरोनाची लक्षणे असणारे, कोरोना बाधित क्षेत्रातून आलेल्या नागरिकांचा समावेश आहे. आत्तापर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना उपचार केंद्राकडून पाठविलेले 16 नमुन्यांचे अहवाल प्रलंबीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सध्यातरी कोरोनावर उपचार घेत असलेली अ‍ॅक्टीव रुग्णसंख्या सहा एवढीच आहे.

देशासह राज्यभरात दिवसेंदिवस कोरोनाची संख्या वाढत आहे. त्यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात वेळीच कठोर पावले उचलली. शासनाने घालून दिलेल्या दिशा, निर्देशांचे तंतोतंत पालन केले. त्यामुळे शेजारील जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असतानाही, जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्ग रोखण्यावर यश मिळाले आहे.

आवश्यक वाचा - कृषी विद्यापीठ करेल आता उद्योजकांची घडवणूक, सरकार देईल 25 लाख रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य

मात्र, त्यानंतरही बाहेरील जिल्ह्यातून येणारे, कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात येणारे, कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या झेत्रातून आलेल्या नागरिकांना तातडीने क्वारंटाईन केले जात आहे. तसेच आवश्यकता पडेल अशा ठिकाणी संपूर्ण गावाच्या सिमाबंद करून घरोघरी जाऊन सर्वेक्षण, आरोग्य तपासणी केली जात आहे. आदी बाब पाहता जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातच गेल्या काही दिवसांत महानगरांतून परतणार्‍यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. 

परिणामी, स्वॅब नमुन्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. ही बाब पाहता तालुकास्तरावरूनच आता संदिग्ध नागरिकांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले जात आहेत. रविवारी (ता.24) रिसोड तालुक्यातून सहा, शनिवारी (ता.23) मानोरा तालुक्यातून चार व मालेगाव तालुक्यातून तीन स्वॅब नमुने तपासणीस पाठविले होते. तर यापूर्वीचे तीन स्वॅब नमुन्यांचे अहवाल प्रलंबीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील 16 स्वॅब नमुन्यांचे अहवाल प्रलंबीत आहेत. त्यामुळे हे प्रलंबीत अहवाल कसे येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नवीन नियमानुसार हा झाला बदल
प्रारंभी कोरोना बाधित रुग्णाचा 14 दिवसानंतर व लगेच 24 तासांत दोन स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले जात होते. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आल्यास रुग्णास सुट्टी देऊन, 14 दिवस गृह विलगीकरणात ठेवले जात होते. मात्र, आता नवीन दिशानिर्देशानुसार कोरोना बाधित रुग्णावर 10 दिवस उपचार करणे, प्रकृतीत सुधारणा दिसून आल्यास, कोरोनाची लक्षणे नसल्यास रुग्णालयातून सुट्टी देऊन गृह विलगीकरण केले जाते. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी दिली.

16 नमुन्यांचे अहवाल प्रलंबीत
जिल्ह्यात आता तालुकास्तरावरूनच संदिग्ध रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले जात आहेत. यामध्ये आज (ता.24) रिसोड तालुक्यातून सहा, शनिवारी (ता.23) मानोरा तालुक्यातील चार व मालेगाव तालुक्यातील तीन, तर यापूर्वीचे तीन असे एकूण 16 नमुन्यांचे अहवाल प्रलंबीत आहेत.
-डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा शल्यचिकित्सक, वाशीम

अशी आहे आजची स्थिती
एकूण घेतलेले नमुने.....156
निगेटिव्ह नमुने...........132
पॉझिटिव्ह नमुने ...........08
अ‍ॅक्टीव रुग्ण..............06
प्रलंबीत अहवाल..........16
सुट्टी झालेले रुग्ण..........02
मृत्यू ......................01