ट्रक-बसच्या अपघातात १६ प्रवासी जखमी

दोघांची प्रकृती गंभीर : जाम चौरस्ता येथील घटना
16 passengers injured in truck-bus accident Jam
16 passengers injured in truck-bus accident Jam

जाम (जि. वर्धा) - चंद्रपूरकडून नागपूरच्या दिशेने येत असलेल्या तेलंगण राज्य मंडळाच्या बस चालकाने ट्रकला मागून धडक दिली. या अपघातात बसचा चालक, वाहकासह १६ जण जखमी झाले. चालक आणि वाहकाची स्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. हा अपघात नागपूर-चंद्रपूर मार्गावरील जाम येथे शनिवारी (ता. २३) पहाटे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगण राज्य मंडळाची टीएस ०८ झेड ०२२४ क्रमांकाची बस नागपूरकडे येत होती. दरम्यान जाम चौरस्ता तृप्ती हॉटेल परिसरात बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. ही बस एमएच ४० सीडी ७४३९ क्रमांकाच्या ट्रकवर मागून धडक. या धडकेने ट्रक रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटला. तर बस रस्त्याच्या दुभाजकावर चढली. यात १६ प्रवासी जखमी झाले. अपघातामुळे तासभर वाहतूक कोंडी झाली होती.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिस उपनिरीक्षक संतोष सपाटे, किशोर येळणे, गौरव खरवडे, सुनील श्रीनाते, अजय बेले यांनी जखमींना बस मधून बाहेर काढत समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रस्त्यात आलेले वाहन बाजूला करून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com