esakal | कर्जासाठी गुगल सर्च करणं पडलं महाग, ४० हजारांसाठी १७ हजाराला गंडा

बोलून बातमी शोधा

file photo

कर्जासाठी गुगल सर्च करणं पडलं महाग, ४० हजारांसाठी १७ हजाराला गंडा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : 40 हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगून कर्जाची रक्कम खात्यात वळती करण्यापूर्वी विविध कारणे सांगून युवकाकडून 17 हजार 300 रुपये अनोळखी व्यक्तीने लुबाडले. चेतन दयाराम सुरपान (वय 29, रा. भिल्ली, धामणगावरेल्वे), असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे.

हेही वाचा: पेटंट सादर करण्यात विदर्भातील विद्यापीठ पिछाडीवर, 'अभिमत' मात्र आघाडीवर

कर्जाची आवश्‍यकता असल्यामुळे गुगलवर सर्चिंग केले. एक कंपनी लोन उपलब्ध करून देत असल्याचे त्याच्या लक्षात आले. दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला असता अनोळखी व्यक्तीने सुरपान यांना फोन करून 40 हजार रुपये कर्ज मंजूर झाल्याचे सांगितले. त्यासाठी आवश्‍यक दस्तऐवज व्हॉट्‌सऍपवर पाठवायला सांगितले. ते दस्तऐवज पाठविल्यानंतर कागदपत्रांसाठी 1 हजार 550, करारासाठी 3 हजार 600, रिझर्व बॅंकेची फी 5 हजार 500, जीएसटी 7 हजार 200 अशी ऑनलाइन रक्कम पाठवायला सांगितली. त्यानंतर पुन्हा अनोळखी व्यक्तीने 9 हजार 600 रुपयांची मागणी केली. फसवणूक करीत असल्याचे सुरपान यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी दत्तापूर ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अनोळखी मोबाईल धारकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

विशेष म्हणजे वारंवार अशा स्वरूपाच्या घटना घडत असतानाही काही नागरिक तोतयांच्या जाळ्यात अडकत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. पोलिसांकडून सुद्धा आवाहन करण्यात आल्यावर देखील अशा घटना घडतच आहेत.