esakal | घुग्घुसमध्ये चोरीच्या घटनांची मालिका सुरूच; तब्बल 17 तोळे सोने, 30 तोळे चांदी लंपास 

बोलून बातमी शोधा

170 grams gold and 3 kilogram silver stole from Ghugus Chandrapur

येथील साईनगर वॉर्ड राधाकृष्ण मंदिर परिसरात पाऊल नारायण जंगम हे कुटुंबीयांसह राहतात. घटनेच्या दिवशी पाऊल जंगम हे वेकोलित कामावर गेले होते. पत्नी व मुलगा कामानिमित्त कुलूप लावून घराबाहेर पडले.

घुग्घुसमध्ये चोरीच्या घटनांची मालिका सुरूच; तब्बल 17 तोळे सोने, 30 तोळे चांदी लंपास 
sakal_logo
By
मनोज कनकम

घुग्घुस (जि. चंद्रपूर)  : घरी कुणीही नसल्याची संधी साधून भरदिवसा चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील आलमारीतील 30 तोळे सोने, 30 तोळे चांदी आणि 70 हजार रुपये रोख असा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी (ता. 6) येथील साईनगर वॉर्डात उघडकीस आल्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. चोरीच्या घटना सातत्याने घडत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा - आता हे काय! आरक्षण निघाले पण उमेदवारच नाही, कोण पाहणार तीन ग्रामपंचायतींचा कारभार?

येथील साईनगर वॉर्ड राधाकृष्ण मंदिर परिसरात पाऊल नारायण जंगम हे कुटुंबीयांसह राहतात. घटनेच्या दिवशी पाऊल जंगम हे वेकोलित कामावर गेले होते. पत्नी व मुलगा कामानिमित्त कुलूप लावून घराबाहेर पडले. दुपारच्या सुमारास घरी कुणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आलमारीत ठेवून असलेले 17 तोळे सोने, 30 तोळे चांदी व 70 हजार रुपये रोख घेऊन पळ काढला.

काही वेळानंतर जंगम यांची पत्नी घरी परतली. यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

नक्की वाचा - मामा-भाचाच्या वयात फक्त चार वर्षांचा फरक; मित्रांसारखे राहत असताना विसरले नात्याचा...

सकाळच्या सुमारास सराफा दुकानात चोरीची घटना घडली. त्याचा शोध घेत असतानाच दुपारी घरफोडी करण्यात आली. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे. पोलिसांनी चोरीच्या घटनांवर अंकुश घालून चोरट्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

संपादन - अथर्व महांकाळ