
खापरखेडा : शेतीसाठी बँकेतून घेतलेल्या कर्जाची रक्कम खात्यात जमा होताच, खापरखेडा येथे बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये झालेल्या हातचलाखीने शेतकऱ्याच्या खात्यातून तब्बल पावणेदोन लाख रुपये लंपास करण्यात आले. ही धक्कादायक घटना खापरखेडा येथील बँक ऑफ इंडिया एटीएम सेंटरमध्ये घडली.