
शिरपूर : रविवारी संध्याकाळी आठ वाजेच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर येथील रिसोड फाटा परिसरात उभे असलेल्या मालवाहक ट्रकवर दुचाकी स्वार धडकल्याने त्यामध्ये ओम बाळूराम बहिरे (वय १९ वर्ष) या तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर कार्तिक विलास कव्हर हा गंभीर जखमी झाला आहे.