
मलकापूर : शहरातील बोदवड नाका वानखडे पेट्रोल पंपाजवळ पोलिस पथकाने गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये १ कोटी ९७ लाख ५० हजार रूपयांची रोकड आढळून आली आहे. त्यात पोलिसांनी दोघांसह रोकड व वाहन ताब्यात घेतले. त्यानंतर तहसीलदार यांचेसह शासकीय पंचासमक्ष रोकड व्हिडीओ शुटींगमध्ये मोजणी करून ती रोकड जिल्हा कोषागार कार्यालय बुलढाणा येथे जमा करण्यासाठी पाठविल्याची कारवाई आज २३ मे रोजी करण्यात आली आहे.