esakal | मेळघाटातील आरोग्य विभाग हादरला; विविध पदांवरील दोन डॉक्टरांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

मेळघाटातील आरोग्य विभाग हादरला; विविध पदांवरील दोन डॉक्टरांचा मृत्यू

मेळघाटातील आरोग्य विभाग हादरला; विविध पदांवरील दोन डॉक्टरांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अचलपूर (जि.अमरावती) : मेळघाटच्या (Melghat) आरोग्य विभागात विविध पदांवर काम करणाऱ्या दोन डॉक्‍टरांचा (doctor's death) लागोपाठ मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. त्यामुळे मेळघाटच्या आरोग्य विभागात (Health Department) एकच खळबळ उडाली आहे. सदर डॉक्‍टरांपैकी एका डॉक्‍टरचा कोरोनाने (Corona), तर दुसऱ्या डॉक्‍टरचा मृत्यू हृदयविकाराने झाला. मात्र, त्यामुळे डॉक्‍टरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.( 2 doctors are no more melghat health department Amravati)

हेही वाचा: महानिर्मितीचं मिशन ऑक्सिजन; कोराडी वीजकेंद्रातून होणार दररोज १ हजार सिलिंडर्सचा पुरवठा

मेळघाटच्या चिखलदरा तालुक्‍यातील काटकुंभ प्राथमिक आरोग्यकेंद्रांतर्गत येत असलेल्या फिरत्या पथकाच्या चूनखडी आरोग्यकेंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असणारे डॉ. सुनील पंडित यांचा एक मे रोजी मृत्यू झाला, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी धूळघाट प्राथमिक आरोग्यकेंद्रातील १०८ रुग्णवाहिकेवर वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणारे डॉ. सत्तार शेख यांचाही मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. सदर दोन्ही डॉक्‍टरांचा लागोपाठ मृत्यू झाल्याने मेळघाटातील आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे.

सध्या मेळघाटात कोरोना आजाराने मोठ्या प्रमाणात डोके वर काढले आहे. याला आटोक्‍यात आणण्यासाठी आरोग्य विभागाचे डॉक्‍टर, कर्मचारी दिवसरात्र सेवा देत आहेत. मात्र मेळघाटवासीयांकडून पाहिजे त्याप्रमाणात सहकार्य होताना दिसत नाही. परिणामी कोरोनाच्या रुग्णामध्ये दररोज वाढ होत आहे. याचा ताण आरोग्य विभागावर सर्वाधिक पडत आहे. परिणामी अनेक डॉक्‍टरांना कोरोनाची लागण झाली तर काही डॉक्‍टरांना आपला जीव गमवावा लागला. यापूर्वीसुद्धा डॉक्‍टरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मात्र यावेळी लागोपाठ दोन डॉक्‍टरांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे.

हेही वाचा: दुर्दैवी! घरातच आढळला माय-लेकीचा मृतदेह; तपासणी होताच समोर आलं धक्कादायक वास्तव

संपादन - अथर्व महांकाळ

loading image