esakal | दुर्दैवी! घरातच आढळला माय-लेकीचा मृतदेह; तपासणी होताच समोर आलं धक्कादायक वास्तव

बोलून बातमी शोधा

null
दुर्दैवी! घरातच आढळला माय-लेकीचा मृतदेह; तपासणी होताच समोर आलं धक्कादायक वास्तव
sakal_logo
By
प्रफुल्ल कुडे

समुद्रपूर (जि.वर्धा) : घरी दोघीच मायलेकी. यात लेक बिमार आणि आई म्हातारी. रोजमजुरी करून कसेबसे पोट भरण्याची कसरत. याच कसरतीत दोघींना केव्हा कोरोनाने ग्रासले पत्ता लागला नाही. आलेल्या आजारपणाकडे दुर्लक्ष केल्याने अखेर या दोघींचा घरी मृत्यू झाला. ही घटना तालुक्‍यातील सावंगी (झाडे) येथे रविवारी (ता. दोन) सकाळी 10 वाजताच्या सुमारास उघड झाली.

हेही वाचा: स्वप्नांची सफर घडविणाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ; टूर ऑपरेटर्स विकताहेत आंबे आणि भाजीपाला

तालुक्‍यातील सावंगी (झाडे) येथे रविवारी राहत्या घरीच माय-लेकीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. दुर्गंधी सुटल्याने हा प्रकार उघड झाला. या दोघींचा मृत्यू कोरोनाने झाल्याचे निदान सायंकाळी झालेल्या तपासणीत पुढे आले आहे. आईचे नाव सुभद्रा डोमाजी मांडवकर आणि मुलगी सुरेखा हरिश्चंद्र पाचखडे (वय 45) अशी मृतांची नावे असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

दोन्ही मृतांची तपासणी करण्यात आली असून ते शवविच्छेदन गृहात रवाना करण्यात आले आहे. या दोघी कुटुंबापसून वेगळ्या राहत असल्याने त्यांच्या मृत्यूचे कारण कळून आले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

आज सकाळी सुभद्रा यांची सुन जिजाबाई प्रकाश मांडवकर हिला घरातून दुर्गंध आली. यामुळे तिने घराकडे जाऊन पाहिले असता, दोघींचे मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळले. तिने याची माहिती घरील सदस्यांना व गावकऱ्यांना दिली. उपसरपंच अजय कुडे व पोलिस पाटील समीर धोटे यांनी तत्काळ पोलिस ठाण्यात संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

हेही वाचा: दुर्दैवी! आईनं मोबाईल हिसकावला म्हणून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

या दोन्ही महिला शेतमजुरी करून स्वतःचा उदरनिर्वाह करीत होत्या. मुलगी सुरेखा सात-आठ वर्षापासून आजारी होती. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे कारण अस्पष्ट असून पुढील तपास ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनात धनंजय पांडे, अमोल पुरी करीत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ