एसटीवर ट्रक आदळून दोन जखमी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

मूर्तीजापुर : या तालुक्यातील अनभोरा कुष्ठग्राम नजीकच्या वळणावर कारंजाहून बुलढाणाकडे जात जाणाऱ्या एस.टी.बसला विरूद्ध दिशेने सुसाट वेगाने येणाऱ्या कांदा भरलेल्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात आज सकाळी साडेआठ वाजता आदळल्याने चालकासह एक प्रवाशी जखमी जखमी झाला. 

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील अनभोरा कुष्ठग्राम जवळील वळणावर कारंजा वरून बुलढाणा कडे जात असलेली बस क्र.एम.एच.४०/ ५९११ आपल्या साईडने जात असता विरूद्ध दिशेने नाशिक येथून कांदा भरून नागपूर कडे भरधाव वेगाने जात असलेला ट्रक क्र.एम.एच.१९z/९५९५ हा समोरा समोर एस.टी.बस वर जावून आदळल्याने बस चालक मो.अनवर मो.अकबर (वय ४५) आणि कारंजा येथील एक प्रवासी जखमी झाला आहे. या अपघातात ट्रक बसवर आदळुन रोडवर आडवा होवुन संपूर्ण कांदा अस्तव्यस्त झाला. तर एस.टी.बसची कॅबीन पुर्णपणे चुराडा झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच मूर्तीजापुर आगाराचे डेपो मॅनेजर प्रविण अंबुलकर, कारंजा आगाराचे अनिल मानके, विभागीय यंत्र अभियंता गाडबैल, विभागीय वाहतूक अधिक्षक ठाकरे, बँक संचालक विजय साबळे, संतोष घोगरे, गणेश घाटे, पांडे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी करून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आणि आगाराच्या वतीने जखमीस तात्काळ मदत देण्यात आली. याप्रकरणी मूर्तीजापुर ग्रामीण पोलिसांनी ट्रक चालकाविरूध गुन्हा दाखल केला असून ठाणेदार नितिन पाटील यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2 injured in the accident of truck and st