esakal | ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तिघा भावांचे मृतदेह बघून अख्खे गाव हळहळले; तलावात बुडून झाला मृत्यू    
sakal

बोलून बातमी शोधा

three bothers are no more due to drowning in lake

यावेळी प्रारंभी मृत  मधुकर हा काही शेळ्या मेंढ्यांच्या आंघोळीसाठी तलावातील खोल पाण्यात उतरला  मात्र शेळ्या मेंढ्या पान्याबाहेर पडतांना मृत मधुकर पाण्यात बुडत असल्याचे पाहुन सुधाकर नामक दुस-या भावाने पाण्या उडी घेतली.

ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तिघा भावांचे मृतदेह बघून अख्खे गाव हळहळले; तलावात बुडून झाला मृत्यू    

sakal_logo
By
दीपक फुलबांधे

लाखांदूर (जि. भंडारा) :-दिवाळी सणाच्या मुहूर्तावर परंपरे  नुसार शेळ्या मेंढ्यांच्या आंघोळीसाठी तलावातील खोल पाण्यात उतरले असता खोल पाण्याचा अंदाज न आल्याने एकमेकाच्या बचावात तीन सख्ख्या भावान्चा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.सदर घटना लाखांदूर तालुक्यातील पुयार/चारभट्टी जंगलातील मामा तलावात ऐन लक्ष्मिपुजनाच्या दिवशी सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास घडली.

मधुकर नीलकंठ मेश्राम(45),सुधाकर नीलकंठ मेश्राम (43) व प्रदिप नीलकंठ मेश्राम (39) रा.पुयार अशी मृत सख्ख्या भावांची नावे आहेत.प्राप्त माहितीनुसार घटनेच्या दिवशी मृतक तिन्ही भावंड  तुषार मधुकर मेश्राम (13)नामक बालकाला घेवुन मालकीच्या अंदाजे 100 शेळ्या मेंढ्यांच्या आंघोळीसाठी गावातील जंगलातील तलावाकडे गेले.होते.

हेही वाचा - घरी सरणाची तयारी अन्‌ मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

यावेळी प्रारंभी मृत  मधुकर हा काही शेळ्या मेंढ्यांच्या आंघोळीसाठी तलावातील खोल पाण्यात उतरला  मात्र शेळ्या मेंढ्या पान्याबाहेर पडतांना मृत मधुकर पाण्यात बुडत असल्याचे पाहुन सुधाकर नामक दुस-या भावाने पाण्या उडी घेतली. मात्र तो देखील बुडतांना दिसल्याने तिस-या प्रदिपने पाण्यात उडी घेतली. मात्र तिघांनाही खोल पाण्याचा अंदाज न आल्याने एकमेकांच्या बचावात तिघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान यावेळी घटनास्थळावर हजर तुषारने सदर दुर्घटनेची मोबाइलवरुन कुटुंबियांना माहिती दिली.सदर माहिती गावक-यांना होताच गावक-यांनी घटनास्थळी धाव घेत गावातीलच काही ढ़िवर बान्धवान्च्या मदतीने तिन्ही मृतदेह तलावातील पाण्यातून बाहेर काढले. यावेळी तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

अधिक माहितीसाठी - खासदार नवनीत राणा धडकणार मातोश्रीवर; मुख्यमंत्री पत्राला उत्तर देत नसल्याचा आरोप

सदर घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना होताच येथील सहाय्यक पोलिस निरिक्षक चहान्दे यांच्यासह पोलिस नाइक दुर्योधन वकेकार,पोलिस अंमलदार संदीप रोकडे,अनिल साबळे सैनिक दशरथ सतिबावने,हुसेन नखाते आदी पोलीस कर्मचा-यांनी घटनास्थाळी जावुन मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत.दरम्यान दिवाळीच्या शुभ पर्वावर पुयार गावात एका गरिब कुटुंबातील तीन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण पुयार गावात शोककळा पसरली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ