esakal | सॅनिटायझर प्यायल्याने आणखी दोघांचा बळी, एकाच आठवड्यात ८ जणांनी गमावला जीव

बोलून बातमी शोधा

file photo
सॅनिटायझर प्यायल्याने आणखी दोघांचा बळी, एकाच आठवड्यात ८ जणांनी गमावला जीव
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वणी (जि. यवतमाळ) : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मद्याची दुकाने बंद ठेवण्यात आल्याने अल्कोहोलिक व्यसनाधीनांची मोठी पंचाईत झाली आहे. शौक भागविण्याकरिता सॅनिटायझरचे पिल्याने वणी शहरातील आणकी दोघांना जीव लागला आहे. त्यामुळे यापूर्वी सॅनिटायझर पिऊन सहा जणांना जीव गमवावा लागला. सॅनिटायझर पिल्याने काल दोघे; तर एका आठवड्यात सहा असे एकूण आठ जणांचा बळी गेला.

हेही वाचा: दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : अखेर एम. एस. रेड्डीला नागपुरातून अटक

काही दिवसांपूर्वीच सॅनिटायझर प्राशन केल्याने तब्बल सहा जणांना जीव गमवावा लागला होता. मंगळवारी (ता. २७) सकाळी साडेआठ वाजता येथील माळीपुरा येथे वास्तव्यास असलेल्या ४९ वर्षीय व्यक्तीचा सॅनिटायझर पिल्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर सायंकाळी आंबेडकर चौकात सलूनचा व्यवसाय करणारा नागेश लक्ष्मण दुर्वे (वय ४५) याने सॅनिटायझरचे पिल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. नागेश गेल्या तीन चार दिवसांपासून दारूची तलफ भागविण्यासाठी सॅनिटायझर पीत होता. त्यामुळे त्याची परिवाराने अनेकदा समजूत काढली. मात्र, व्यसनाच्या आहारी गेलेल्या नागेशने कुणाचेही ऐकले नाही. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता त्याची प्रकृती बिघडल्याने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गेल्या पाच दिवसांत वणी शहरात आठ जणांचा सॅनिटायझर पिल्याने मृत्यू झाला आहे.