'सुपर स्पेशालिटी'वर अर्धी 'सर्जरी', रिक्तपदांच्या निर्मितीला मान्यता; 465 पदांची गरज असताना मिळाली दोनशे

200 were received when 465 posts needed for super specialty hospital in yavatmal
200 were received when 465 posts needed for super specialty hospital in yavatmal

यवतमाळ : पंतप्रधान स्वास्थ सुरक्षा योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या राज्यातील चार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आवश्‍यक पदनिर्मितीचा प्रश्‍न राज्य शासनाने सोडविला आहे. एकूण 888 पदनिर्मितीला मान्यता दिली आहे. मात्र, तरीदेखील एकट्या यवतमाळ येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला 465 पदांची आवश्‍यकता आहे. त्यामुळे सध्यातरी सुपर स्पेशालिटीवर अर्धीच सर्जरी झाली आहे. असे असले तरीदेखील पदेनिर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.

यवतमाळ येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या पदनिर्मितीला राज्य शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. परिणामी जवळपास दीडशे कोटी रुपये खर्च करून उभारलेले हॉस्पिटल सुरू होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. सुपर स्पेशालिटी इमारतीचे किरकोळ कामे अजून बाकी आहेत. तरीदेखील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात पाच मजली इमारत उभी आहे. अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे तयार आहेत. आवश्‍यक असलेल्या पदांचीनिर्मिती नसल्याने इमारत बंदावस्थेत पडून होती. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर उपाययोजना म्हणून सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दोनशे खाटांचे कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले होते. वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्‍टर व कर्मचारी याठिकाणी सेवा देत आहेत. सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी पहिल्या वर्षी 324 व दुसऱ्या वर्षी 141, अशा एकूण 465 पदनिर्मितीचा प्रस्ताव वसंतराव शासकीय वैद्यकीय महाविद्यायाच्या अधिष्ठातांमार्फत वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक यांच्याकडे पाठविण्यात आला होता. 

कोरोना संकटामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रस्ताव तशाच होता. नुकतेच राज्यातील चार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी 888 पदांच्या निर्मितीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यातील जवळपास 223 पदांची निर्मिती यवतमाळ सुपर स्पेशालिटी रुग्णालयात झाली आहे. मंजूर करण्यात आलेल्या पदांमध्ये विविध विषयांवरील तज्ज्ञ डॉक्‍टर, परिचारिका, वैद्यकीय उपकरणासाठीचे तंत्रज्ञ व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याठिकाणी सहा सुसज्ज शस्त्रक्रियागृह असून, 220 खाटांच्या या रुग्णालयात न्युरो सर्जरी, न्यूरॉलॉजी, कॉर्डिओलॉजी आदी महत्वाचे विभाग राहणार आहेत. पदनिर्मिती झाल्याने रुग्णालय लवकरच सुरू होण्याच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत. 

पदनिर्मितीचा प्रश्‍न आता सुटला आहे. यवतमाळला 223 जागांची मंजुरी मिळाली आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू झाल्यानंतर यवतमाळसह इतर जिल्ह्यांतील नागरिकांनादेखील आरोग्यसेवा मिळणार आहे. त्यासाठी विविध प्रकारची वैद्यकीय उपकरणे आली असून, ती लावली जात आहेत. 
- डॉ. मिलिंद कांबळे, अधिष्ठाता, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com