esakal | अमरावतीतील बाळाचे मृत्यूप्रकरण : आईला तीन दिवसांची पोलिस कोठडी; नव्याने नोंदविले जाईल बयाण
sakal

बोलून बातमी शोधा

The babys mother was remanded in police custody for three days

आता प्रत्यक्ष खुनाच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर त्यांचे दुसऱ्यांदा बयाण नोंदविले. त्यात काही ठिकाणी तफावत आढळली. आवश्‍यकता भासल्यास तपास यंत्रणा पुन्हा संशयित आरोपी महिलेस घटनास्थळी नेऊन चौकशी करतील, असे पोलिस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांनी सांगितले.

अमरावतीतील बाळाचे मृत्यूप्रकरण : आईला तीन दिवसांची पोलिस कोठडी; नव्याने नोंदविले जाईल बयाण

sakal_logo
By
संतोष ताकपिरे

अमरावती : न्यू. प्रभात कॉलनीत घराच्या आवारातील विहिरीत बाळाला फेकून हत्या केल्याप्रकरणी बाळाच्या आईला न्यायालयाने मंगळवारपर्यंत (ता. ८) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. नम्रता मनीषसिंह परमार (वय २५, रा. छपरा, बिहार) असे अटक संशयित आरोपी महिलेचे नाव आहे.

शुक्रवारी (ता. ४) सदर महिलेस आधी चौकशीसाठी ताब्यात घेऊन सायंकाळी पोलिसांनी अटक केली होती. शनिवारी (ता. ५) तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयापुढे हजर केले. २९ नोव्हेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. ३० नोव्हेंबरला घराच्या आवारातील विहिरीत या बाळाचा मृतदेह आढळला होता. अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी पहिल्यांदाही कुटुंबातील सर्व सदस्यांसह आसपासच्याही काही रहिवाशांचे बयाण नोंदविले होते.

सविस्तर वाचा - दुर्दैव! पतीवर अंत्यसंस्कार सुरू असताना पत्नीवर रुग्णालयात सुरू होता उपचार

आता प्रत्यक्ष खुनाच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर त्यांचे दुसऱ्यांदा बयाण नोंदविले. त्यात काही ठिकाणी तफावत आढळली. आवश्‍यकता भासल्यास तपास यंत्रणा पुन्हा संशयित आरोपी महिलेस घटनास्थळी नेऊन चौकशी करतील, असे पोलिस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांनी सांगितले. सदर महिलेच्या भावाची शुक्रवारपासून (ता. ४) पोलिस विचारपूस करीत आहेत. परंतु, त्याला या गुन्ह्यात अटक केली नसल्याचे तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

नम्रता तीस सेकंदासाठी गेली बाथरुममध्ये

२९ नोव्हेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास न्यू. प्रभात कॉलनी येथील घरातून सव्वा महिन्याचे बाळ अचानक बेपत्ता झाले होते. घटना घडली तेव्हा घरात नम्रता आणि तिचा भाऊ असे दोघेच हजर होते. घटनेच्या दिवशी नम्रता तीस सेकंदासाठी बाथरुममध्ये गेली व परत आली असता, तिला बेडरुममधील बाळ बेपत्ता झाल्याचे लक्षात आले. तिने भावाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर वडिलांनी राजापेठ ठाण्यात तक्रार दिली होती. मृतदेह आढळल्यानंतर दुसऱ्या दिवशी खुनाच्या गुन्ह्यांची नोंद घेतली होती.

अधिक वाचा - सव्वा महिन्याच्या बाळाच्या खुनाचे रहस्य कायम; कुटुंबीयांनी पित्याला दिली घटनेची माहिती

हत्येचे रहस्य अद्याप कायम

पाचव्या दिवशी गुरुवारी बाळाच्या पित्याची राजापेठ ठाण्यात बंद द्वार चौकशी झाली. बिहारच्या एका गावात बाळाचे वडील राहतात. चौकशीत पोलिस नेमके कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचले. यासंदर्भात तपास अधिकाऱ्यांनी भाष्य करण्याचे टाळले. हत्येचे रहस्य अद्याप कायम आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

loading image