सायंकाळी घरून निघालेल्या मुलाचा मृतदेहच दिसला, नातेवाईकांनी फोडला हंबरडा

crime
crimee sakal
Updated on

अमरावती : शहरातील बेलपुरा येथील युवकाचा बडनेरा हद्दीत महामार्गावर वनविभागाच्या जंगलात खून करण्यात आला. रविवारी (ता. 30) दुपारी एकच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह जाळण्याचाही (dead body found in forest) प्रयत्न झाला. (22 years old man dead body found in forest near amravati)

crime
जागतिक तंबाखू विरोधी दिन : तंबाखू सेवनाचे हृदयासह रक्तवाहिन्यांवर परिणाम

बच्चू ऊर्फ रोहन किसन वानखडे (वय 22, रा. बेलपुरा), असे मृत युवकाचे नाव असल्याचे बडनेरा पोलिसांनी सांगितले. रोहन हा शनिवारी (ता. 29) सायंकाळपासून बेपत्ता होता. रात्री उशिरापर्यंत घरी परत आला नाही. त्यामुळे तो बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी साडेअकरा ते बाराच्या सुमारास राजापेठ पोलिसांत नोंदवली. दस्तऐवज व फोटो नसल्याने बेपत्ता असल्याची नोंद रात्री झाली नाही. आज (ता. 30) पुन्हा बच्चू ऊर्फ रोहन याचे नातेवाईक तक्रार देण्यासाठी राजापेठ ठाण्यात पोहोचले. परंतु त्यापूर्वीच दुपारी एकच्या सुमारास नागपूर अकोला महामार्गावर बडनेरा हद्दीत जंगलात मृतदेह आढळला. मृतदेह पाहून नातेवाईकांनी हंबरडा फोडला. मृतदेहापासून काही फूट अंतरावर त्याची चप्पल आढळली. याठिकाणी राजापेठ ठाण्याची हद्द संपून, बडनेरा ठाण्याची हद्द सुरू होते. तसे फलक महामार्गावर रस्त्याच्या कडेला लावलेले आहेत. त्या फलकापासून पन्नास फूट आतमध्ये मृतदेह आढळला. मृत व्यक्तीच्या शरीरावर धारदार शस्त्राचे जवळपास 35 ते 40 घाव होते. त्यानंतर मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न झाल्याचे आढळून आले. बच्चू ऊर्फ रोहन वानखडे याच्या हत्येचे कारण समजू शकले नाही. घटनास्थळी श्‍वानपथकासह न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे पथकसुद्धा दाखल झाले होते. बडनेरा गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेटी दिल्यात. पोलिसांचे श्‍वान घटनास्थळापासून महामार्गापर्यंत गेले. त्यामुळे हल्लेखोर खून केल्यानंतर याच मार्गाने पळाल्याचा पोलिसांचा संशय आहे. वृत्त लिहीस्तोवर बडनेरा पोलिसांकडून खुनाचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. हत्येचे कारण समजू शकले नाही.

संपर्कातील काही पोलिसांच्या रडारवर -

शनिवारी (ता. 29) रात्रीच खून झाल्याची शक्‍यता वर्तविण्यात आली. घटनेच्या वेळी बच्चू ऊर्फ रोहन सोबत असलेल्या लोकांचा शोध पोलिसांनी सुरू केला होता.

वर्षभरापूर्वी तडीपारीची कारवाई -

बच्चू ऊर्फ रोहन वानखडे याच्याविरुद्ध दुखापतीसह आर्मऍक्‍ट सारखे बरेच गुन्हे दाखल असल्याने राजापेठ पोलिसांनी 2020 मध्ये त्याच्यावर तडीपारीची कारवाई केली होती. ही कारवाई नंतर रद्दही झाली होती, असे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com