जागतिक तंबाखू विरोधी दिन : तंबाखू सेवनाचे हृदयासह रक्तवाहिन्यांवर परिणाम

जागतिक तंबाखू विरोधी दिन : तंबाखू सेवनाचे हृदयासह रक्तवाहिन्यांवर परिणाम
Updated on

नागपूर : तंबाखूतील (Tobacco) घातक रसायने ‘हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सर’साठी ८५ टक्के जबाबदार आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार प्रत्येक सहा सेकंदामध्ये एका व्यक्तीचा तंबाखूमुळे मृत्यू (One dies of tobacco in six seconds) होतो. कॅन्सरच नाही तर तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनातून हृदयावर घातक परिणाम (Fatal effects on the heart) होतात. तंबाखू सेवन तसेच फिल्टर सिगरेट तेवढीच घातक असून बहुतेक रक्तवाहिन्यांवरही होत असल्याचे निरीक्षणातून नोंदविण्यात आल्याचे तज्ज्ञांशी साधलेल्या संवादातून पुढे आले आहे. (World-No-Tobacco-Day-The-effects-of-tobacco-use-on-blood-vessels,-including-the-heart)

तंबाखूमुळे दरवर्षी जगात सात दशलक्ष मृत्यू होतात आणि जगातील धूम्रपान करणारे जगातील ८० टक्के नागरिक हे अल्प व मध्यम उत्पन्न गटातील आहेत. तंबाखूमुळेच तोंड, जीभ, घसा, अन्ननलिका, आतडी व इतरही अवयवांचे कॅन्सर होतात. त्याशिवाय हृदयावर होणारा तंबाखूचा परिणामही तितकाच घातक आहे, हेही वैद्यकीयदृष्ट्य़ा सिद्ध झाल्याचे शहरातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सुनील वाशिमकर म्हणाले.

जागतिक तंबाखू विरोधी दिन : तंबाखू सेवनाचे हृदयासह रक्तवाहिन्यांवर परिणाम
बुरशीचे आणखी ३ बळी; नागपूर जिल्ह्यात मृत्यूसंख्या पोहोचली ८५ वर

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांमुळे शहरातील वेगवेगळ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळेच हृदयरोगाचा झटका तसेच पक्षाघात होण्याची भीती असते. विविधांगी उपचारांसाठी येणाऱ्या ७५ टक्के हृदयरोगांनी कधी ना कधी, कोणत्या ना कोणत्या क्षणी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केले असते, असे ते म्हणाले.

सध्या कोरोना विषाणूवर कुठलंच औषध किंवा लस नाही. रोगप्रतिकारक क्षमता हीच आपली आजाराविरोधात लढण्यासाठीची ढाल आहे. फिल्टर सिगरेट तेवढीच घातक आहे. सिगरेट ओढण्यासोबतच तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे शरीरातील रोगप्रतिकार शक्तीचा ऱ्हास होतो. धूम्रपान-तंबाखूची सवय सोडण्यासाठी शास्त्रीय पद्धती विकसित झाल्या आहेत, तरुण पिढीने तसेच नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे.
- डॉ. सुशांत मेश्राम, विभागप्रमुख, श्‍वसनरोग विभाग, मेडिकल-सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर
जागतिक तंबाखू विरोधी दिन : तंबाखू सेवनाचे हृदयासह रक्तवाहिन्यांवर परिणाम
सायकलवर समोसे विकत ओढते संसाराचा गाडा; मातेचा मुलांसाठी संघर्ष
धूम्रपानामुळे थेट फुप्फुसावर परिणाम होतो. फुप्फुसावर परिणाम झाल्यानंतर त्याचे ‘प्रेशर' हृदयावर येते. हृदयाचे ‘पंपिंग’ गंभीररीत्या प्रभावित होते. ज्याचा परिणाम आयुष्यभरासाठी होऊ शकतो. यामुळे तंबाखूजन्य पदार्थापासून दूर राहा.
- डॉ. सुनील वाशिमकर, सहयोगी प्राध्यापक तसेच हृयरोतज्ज्ञ, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर
तंबाखूच्या सेवनामुळे मुखकर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. सातत्याने तंबाखू गुटखा चघळल्याने तोंडाची त्वचा काळपट होते. इथूनच कर्करोगाला सुरुवात होते. यासाठी नियमितपणे दंत व मुखतपासणी करावी. सुपारी चघळणे, तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा, जर्दा, पानमसाला, खर्रा यापासून दूरच राहावे.
- डॉ. वैभव कारेमोरे, प्राध्यापक, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर

(World-No-Tobacco-Day-The-effects-of-tobacco-use-on-blood-vessels,-including-the-heart)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com