
विजापूर-कांकेर : छत्तीसगडच्या बस्तर भागामध्ये दोन विविध ठिकाणांवर सुरक्षा दले आणि नक्षलवादी यांच्यात गुरुवारी जोरदार चकमकी झाल्या. या चकमकीमध्ये २४ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. विजापूर जिल्ह्यामध्ये २० नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून कांकेरमध्ये चार नक्षलवादी मारले गेले आहेत.