
अर्चना फाटे
मोताळा (जि. बुलडाणा) : सन २०२३ मध्ये जाहीर झालेल्या दुष्काळ सदृश भागातील इयत्ता १० वी व १२ वीचे तब्बल २ लाख ५८ हजार ८९९ विद्यार्थी परीक्षा शुल्क परत मिळण्यापासून अद्यापही वंचित आहेत. अशा विद्यार्थ्यांचे बँक खाते अपडेट करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी विभागीय मंडळाच्या विभागीय सचिवांना दिल्या आहेत.