Karanja Crime : पोलिसांमुळे मिळाले २७ बैलांना जीवदान, ४ बैलांचा मृत्यू, आरोपी विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

पोलिसांमुळे मिळाले २७ बैलांना जीवदान, ४ बैलांचा मृत्यू
Bull Life Saving
Bull Life Savingsakal
Updated on

- अनंत सुपनर

कारंजा - मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी एम.पी. ०६ एच. सी. ३१९९ क्रमांकाच्या ट्रकची समृद्धी महामार्गावरील टोल नाक्याजवळ तपासणी करण्याकरता पोलीस थांबले असता ट्रकचालक नागपूरकडून येताना दिसला. सदर वाहनास थांबविण्याचा प्रयत्न केला असता तो टोल नाक्याचा दांडा तोडून कारंजा शहराकडे पळाल्याने पोलिसांनी त्याचा पाठलाग केला व सावरकर चौकाच्या पुढे ट्रक थांबवून तपासणी केली.

त्यात ३१ बैल निर्दयतेने कोंबलेले दिसून आले. यात चार बैल मृतावस्थेत आढळून आले. यावेळी पोलिसांनी नमूद आरोपीकडून १० लाख रुपये किमतीचा ट्रक आणि ४ लाख ६५ हजार किमतीचे बैल असा एकूण १४ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

सदर प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गजानन कळणाजी पत्रे यांचे फिर्यादीवरून आरोपी आयुब अली कुदरत अली रा. मोती नगर नवीन जेल रोड भोपाल मध्य प्रदेश याचे विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२५ सह इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

ट्रकमधील बैलांना ताब्यात घेऊन कारंजा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून २७ जिवंत बैलांचे मेडिकल व चार मृत जनावरांचे शवविच्छेदन करण्यात आले आणि जिवंत २७ बैलांना सुरक्षित स्थळी ठेवण्याकरिता पांजरपोळ गोरक्षण संस्था पलाना येथे रामकृष्ण भोलाराम ठाकूर यांच्या ताब्यात देण्यात आले व तेथेच ४ मृत जनावरांचे जमिनीत गाडून अंत्यविधी करण्यात आला. पोलिसांच्या या कारवाईमुळे २७ बैलांना जीवदान मिळाले. ही कारवाई ठाणेदार दिनेश चंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात शहर पोलिसांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com