३ कोटी ३३ लाखांनी फसवणूक; कर बुडविणाऱ्याविरुद्ध गुन्हा

३ कोटी ३३ लाखांनी फसवणूक; कर बुडविणाऱ्याविरुद्ध गुन्हा

अमरावती : कोट्यवधींची खरेदी-विक्री करून शासनाने आकारलेला कर चुकवून तीन कोटी ३३ लख २० हजार ८५ रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. राजापेठ ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. विजयकुमार किसन तायडे असे शासनाची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव आहे.

विजयकुमार याने मे. शिवाजी ट्रेडिंग कंपनी या नावाने प्रतिष्ठान स्थापन करून २१ सप्टेंबर २०१६ पासून आर्थिक व्यवहार केला. राज्याचे अमरावती येथील सहायक कर आयुक्त ए. एस. अढाव यांनी सदर प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदविली. विजयकुमार तायडे याने दसरा मैदान, हनुमान मंदिर या परिसरात सदर नावाने व्यवसाय करीत असल्याबाबतचे दस्तऐवज प्रशासनाकडे सादर करून ऑनलाइन पद्धतीने त्याबाबतची मूल्यवर्धीत कराची (वॅट) नोंदणी केली होती. परंतु, नोंदणी केल्यानंतर बरेच दिवस कोणत्याही प्रकारचा व्यवसाय केला नाही.

३ कोटी ३३ लाखांनी फसवणूक; कर बुडविणाऱ्याविरुद्ध गुन्हा
केशर खूप गुणकारी; जाणून घ्या त्याच्या लाभांविषयी...

१ जुलै २०१७ पासून वस्तू व सेवाकर कायदा जीएसटी अंमलात आल्याने पुन्हा तशा स्वरूपाची नोंदणी केली. त्यावेळी स्वत:चा फोटो आणि उत्तम ठाकरे नामक व्यक्तीच्या वीजदेयकाची प्रत ऑनलाइन नोंदणी करताना अपलोड केली होती. त्यानंतर विजयकुमार तायडे याने १ जुलै २०१७ ते ३१ मार्च २०१८ मध्ये जवळपास ६६ कोटी ७६ लाख ८८ हजार ९१६ रुपये एवढ्या रकमेच्या मालाची खरेदी-विक्री केली. त्यावर इंट्रीग्रेट कर म्हणून ३ कोटी १७ लाख ८५ हजार १८७ रुपये नोंद (वजावट) घेतली.

१ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत तायडे याने स्थापन केलेल्या कंपनीच्या माध्यमातून ३ कोटी २२ लाख ३२ हजर ८५२ रुपये मालाची विक्री करून त्यावरचा १५ लाख २४ हजार ९८९ रुपयांची नोंद (वजावट) घेतली. अशाप्रकारे शासनाची दिशाभूल करून ३ कोटी ३३ लाख २० हजर ८५ रुपये एवढ्या रकमेची शासनाची फसवणूक केली, असे सहायक विक्रीकर आयुक्त ए. एस. अढाव यांनी राजापेठ ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीत स्पष्ट केले आहे.

३ कोटी ३३ लाखांनी फसवणूक; कर बुडविणाऱ्याविरुद्ध गुन्हा
ड्रॅगन पॅलेस टेम्पल : बौद्ध पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध
प्रकरण आर्थिक गुंतागुंतीचे आहे. शिवाय फसवणुकीची रक्कमही तीन कोटींवर असल्यामुळे सदर प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला.
- मनीष ठाकरे, पोलिस निरीक्षक, राजापेठ ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com