esakal | यवतमाळ : बस-ट्रकच्या धडकेत 16 प्रवासी जखमी, दोन गंभीर
sakal

बोलून बातमी शोधा

accident

यवतमाळ : बस-ट्रकच्या धडकेत 16 प्रवासी जखमी, दोन गंभीर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आर्णी (जि. यवतमाळ) : नागपूर-तुळजापूर या महामार्गावर (nagpur tuljapur highway) यवतमाळ ते आर्णी यादरम्यान भरधाव बस व ट्रकची समोरासमोर धडक होऊन (yavatmal accident) बसचालकासह 16 प्रवासी जखमी झाले. त्यापैकी दोन जण गंभीर आहेत. हा अपघात आज शनिवारी (ता.3) सकाळी दहाच्या सुमारास किन्ही फाट्याजवळ झाला. येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथोमचार करून जखमींना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात (yavatmal government hospital) हलविण्यात आले आहे. (16 injured in accident on nagpur tuljapur highway at yavatmal)

हेही वाचा: ZP पोटनिवडणूक : १६ पैकी १२ उमेदवार निश्चित, चार जागांसाठी रस्सीखेच

दारव्हा येथून निघालेली बस (क्रमांक-एमएच 40-एन-8078) ही 21 प्रवासी घेऊन आर्णीकडे येत होती. त्याचवेळी कुर्डुवाडी (जि. पुणे) येथून डाळिंब घेऊन नागपूरकडे जाणार्‍या आयशर ट्रकने (क्रमांक एमएच 45-एटी-4573) बसला जबर धडक दिली. त्यात बसचालकासह 16 प्रवासी जखमी झाले. यापैकी दोन जण गंभीर असून, त्यांना यवतमाळ येथे हलविण्यात आले. घटनेची माहीती मिळताच आर्णी पोलिस घटनास्थळी पोहोचले व पंचनामा केला. दरम्यान, बसचे वाहक विनोद मिरासे यांनी आर्णी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आयशर ट्रकचा चालक अजित महादेव भनूर (रा. कदमवाडी ता. मिरज जि. सांगली) याला आर्णी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

अपघातातील जखमींची नावे :

बसचालक रमेश रामचंद्र बुचके (वय 50, रा. दारव्हा), प्रवासी आनंद गोपाल रामटेके (वय 71, रा. लोणी), दिव्यांश किरण रामटेके (वय 4, रा. लोणी), सुशीला भिमप्रकाश मुजमुले (वय 32, रा. जवळा), अनिता गजानन जाधव (वय 45, रा. वळसा ता. दारव्हा), विमल खुशाल मुजमुले (वय 70, रा. जवळा), नम्रता युवराज डोळस (वय 22, रा. महागाव), विष्णू गोरखनाथ इंगोले (रा. महागाव), अंकीत राजेश चांडक (वय 28, रा. आर्णी), ज्योती बाळू राठोड (वय 32, रा. वडगाव गाडवे), नयना बाळू राठोड (वय 5, रा. वडगाव), अनूसया विष्णू इंगोले (वय 55, रा. महागाव), विलास शंकर काळे (वय 40, रा. जवळा), विठ्ठल कुरपाजी पिंपळकर (वय 63, रा. तरनोळी), नागोराव भिकाजी जगताप (वय 65) व बसचे वाहक विनोद मिरासे.

loading image
go to top