esakal | ZP पोटनिवडणूक : १६ पैकी १२ उमेदवार निश्चित, चार जागांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच
sakal

बोलून बातमी शोधा

nag zp

ZP पोटनिवडणूक : १६ पैकी १२ उमेदवार निश्चित, चार जागांसाठी रस्सीखेच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जिल्हा परिषदेच्या (nagpur zp by election) १६ जागांसाठी होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस (congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) १२ उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत. दोन्ही काँग्रेसने सदस्यत्व रद्द झालेल्या उमेदवारांनाच परत उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उर्वरित फक्त चार जागांसाठी दोन्ही काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. (12 candidate final for nagpur zp by election)

हेही वाचा: पेट्रोल पंपावर होणारी लूट नियंत्रणात येण्याची शक्यता; वाचा कारण

ओबीसींसाठी राखीव असलेल्या सर्कलमधील विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे सदस्यत्व न्यायालयाच्या आदेशाने रद्द झाले आहे. यात काँग्रेसच्या ७, राष्ट्रवादीच्या ४, भाजपच ४ आणि शेकापच्या एका सदस्याचा समावेश आहे. शेकाप महाविकास आघाडीत असल्याने येथेही मागील उमेदवारच कायम राहणार आहे. त्यामुळे भाजपने जिंकलेल्या चार जागांवर पराभूत झालेल्या उमेदवारांमध्ये फेरफार होण्याची शक्यता आहे. भाजपने तीन जागांवर काँग्रेस आणि एक सर्कलमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभूत केले होते. येथे दुसऱ्या क्रमांकवर असलेल्या उमेदवारांनी दावा केला आहे. मात्र, त्यांनाच परत उमेदवारी देण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. पराभूत झाल्यानंतर सक्रिय नसलेल्या सदस्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी उमेदवारीसाठी जोर लावला आहे.

भाजपला १२ सर्कलमध्ये उमेदवार बदलण्याची संधी आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्याही भरपूर आहे. त्यांचे चार सदस्यांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार आहे. त्यापैकी अनिल निधान भाजपचे गटनेते होते. ते माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे अत्यंत निकटवर्ती आहेत.

उमेदवार तेच, चिन्ह बदलणार -

वानाडोंगरी सर्कलमध्ये राष्ट्रवादीच्या सदस्य सुचिता ठाकरे यांनी चार दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला. सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी भाजपच्या उमेदवार रश्मी कोटगुले यांना पराभूत केले होते. ठाकरे मूळच्या भाजपच्याच आहेत. तिकीट न मिळाल्याने त्यांनी राष्ट्रवादीची ऑफर स्वीकारली होती. दुसरीकडे कोटगुले या आता राष्ट्रवादीत सामील झाल्या आहेत. त्यामुळे वानाडोंगरी सर्कलमध्ये उमेदवार तेच राहणार आहे. मात्र त्यांचे चिन्ह बदलणार आहे.

loading image
go to top