संतापजनक प्रकार! शेत दाखवण्याच्या बहाण्याने महिलेवर सामूहिक अत्याचार; तिघांना अटक एक पसार 

3 men misbehaved with a woman in amravati District
3 men misbehaved with a woman in amravati District

अमरावती : शेत दाखविण्याच्या बहाण्याने एका महिलेला भानखेडा शिवारात नेल्यावर तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. ही धक्कादायक घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. मात्र मुख्य व्यक्तीच पसार असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सुरेश विष्णू राठोड (वय 26, रा. कस्तुरा), रतन अवधुत पाटील (वय 25) व दिनेश जाधव (वय 26, दोघेही रा. शोभानगर), अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. शहरातील रहिवासी पीडित 30 वर्षीय महिलेची समीरसोबत ओळख आहे. सोमवारी दुपारी समीर सदर महिलेला शेत दाखविण्यासाठी भानखेडा शिवारात घेऊन गेला. 

दोघेही शेतात असताना काही वेळातच सुरेश, रतन व दिनेशही तेथे आले. या वेळी चौघांनी या महिलेवर अत्याचार केला. त्यानंतर चौघांनीही तेथून पळ काढला. या घटनेनंतर भांबावलेल्या महिलेने ग्राम भानखेडा गाठून गावकऱ्यांसमोर आपबिती कथन केली. महिलेची अवस्था बघून गावकऱ्यांनी बडनेरा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने गाव गाठून महिलेला ठाण्यात आणले.

त्यांच्या तक्रारीवरून चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास आरंभण्यात आला. घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी या प्रकरणातील सुरेश, रतन व दिनेश या तिघांना अटक केली. समीर अद्याप फरार असून त्याचा कसून शोध सुरू आहे. अटकेतील तिघांना बुधवारी (ता. नऊ) न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

अटक करण्यासाठी ठाणेदार पंजाबराव वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रशांत डगवार, सुनील गिरपुंजे, सुनील अंबुलकर, इशय खांडे, अक्षय देशमुख, पुरुषोत्तम देवरे आदींनी सहकार्य केले.
.
संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com