esakal | दुर्दैवी! ४ दिवसांपासून शवागारात पडून होता वडिलांचा मृतदेह; पोटच्या पोराने मोबाईल केला बंद.. अखेर...  
sakal

बोलून बातमी शोधा

Son denied to accept mortal remains of his father in amravati

चौथ्या दिवशी सायंकाळी मुलगा काही लोकांना घेऊन इर्विनच्या शवागारासमोर आला. पोलिसांनी कायदेशीर कारवाई करून मृतदेह मुलाच्या स्वाधीन केला. जन्म देणाऱ्या पित्यावर त्याच्या मृत्यूनंतर असा प्रसंग ओढविल्याबद्दल पोलिसांनी देखील दु:ख व्यक्त केले.

दुर्दैवी! ४ दिवसांपासून शवागारात पडून होता वडिलांचा मृतदेह; पोटच्या पोराने मोबाईल केला बंद.. अखेर...  

sakal_logo
By
संतोष ताकपिरे

अमरावती : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पित्याचा मृतदेह स्वीकारण्याची मुलाची मानसिकता दिसत नव्हती. त्यामुळे अखेरचा उपाय म्हणून पोलिसांच्या भाषेत त्याची समजूत काढली. मृतदेह न स्वीकारल्यास पोलिस बेवारस म्हणून अंत्यसंस्कार करतील. पित्याच्या मृत्यूचे प्रमाणपत्रही मिळविणे कठीण जाईल. यासह विविध मुद्दे सांगितल्याने मुलगा वडिलांचा मृतदेह स्वीकारण्यास तयार झाला.

चौथ्या दिवशी सायंकाळी मुलगा काही लोकांना घेऊन इर्विनच्या शवागारासमोर आला. पोलिसांनी कायदेशीर कारवाई करून मृतदेह मुलाच्या स्वाधीन केला. जन्म देणाऱ्या पित्यावर त्याच्या मृत्यूनंतर असा प्रसंग ओढविल्याबद्दल पोलिसांनी देखील दु:ख व्यक्त केले.

अधिक माहितीसाठी - .. तर विदर्भात महापूर आलाच नसता.. महापुराला जबाबदार कोण? ऐतिहासिक विसर्ग करण्याची खरंच गरज होती का?

दर्यापूर तालुक्‍यातील एका कोरोनाबाधित व्यक्तीचा उपचारादरम्यान कोविड रुग्णालयात पाच दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. रुग्णालय प्रशासनाने एकुलत्या एक मुलाला वडिलांच्या निधनाची माहिती दिली. मृतदेह त्याच दिवशी सायंकाळी इर्विन रुग्णालयाच्या शवागारात ठेवला होता. मात्र, तीन दिवस लोटूनही अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेण्यासाठी मुलगा इर्विनमध्ये आलाच नाही.

इर्विनच्या पोलिसांनी माहिती देण्यासाठी वारंवार मुलाशी संपर्क केला. सुरुवातीच्या संभाषणानंतर मुलाने मोबाईल स्वीचऑफ करून ठेवला. इर्विन चौकीतील पोलिसांचा संपर्क सतत सुरूच होता. मुलगा येत नसल्याचे बघून मृत्यूचा मेमो कोतवाली ठाण्यात दिला गेला. चौथ्या दिवशी शुक्रवारी दुपारी पुन्हा इर्विन चौकीतील पोलिसांनी मुलाच्या मोबाईलवर संपर्क साधला तेव्हा त्याने फोन उचलला असता मृतदेह ताब्यात घेण्यासाठी इर्विनमध्ये येण्यास सांगितले.

चार दिवसांनी स्वीकारला मृतदेह

कोरोना विषाणूची लागण होऊन अनेकांना जीव गमवावा लागत आहे. वडिलांचा कोरोना विषाणूने मृत्यू झाल्यानंतर मुलाने मृतदेह स्वीकारण्यासाठी चक्क चार दिवस लावल्याची धक्कादायक घटना शहरात उजेडात आली आहे.

हेही वाचा - मला लाच मागितली... आता मी काय करू?, तक्रार कुठे करू? सांगा

अनेकांची मानसिकता बदलली
मृत्यू कुणाचाही होवो वाईटच वाटते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेकांची मानसिकता बदलली आहे. कोविडने मृत्यू झालेल्यांचा मृतदेह स्वीकारण्यासाठी मानवतेच्या दृष्टीने विचार करावा. सकारात्मक मानसिकता ठेवा.
- डॉ. श्‍यामसुंदर निकम,
जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image
go to top