कारंजात जणू काही तासभर होता यमराजांचा मुक्काम; एकाच तासात तब्बल तीन अपघातात तिघांचा मृत्यू

रुपेश खैरी 
Sunday, 29 November 2020

तालुक्यातील बोरगाव (ढोले), एकांबा, ठाणेगाव येथील युवकांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. या तिन्ही घटना एका तासाच्या कालावधीत घडल्या. तीनही युवक एकाच तालुक्यातील असल्याने तालुक्यावरच शोककळा पसरली आहे. 

कारंजा (जि. वर्धा) : तालुक्यातील बोरगाव (ढोले), एकांबा, ठाणेगाव येथील युवकांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. या तिन्ही घटना एका तासाच्या कालावधीत घडल्या. तीनही युवक एकाच तालुक्यातील असल्याने तालुक्यावरच शोककळा पसरली आहे. 

पहिला अपघात टोल नाक्याजवळ झाला. यात अज्ञात वाहनाने दुचाकीला अपघात झाला.  तर दुसऱ्या घटनेत जंगली श्वापदाने धडक दिली तर तिसऱ्या घटनेत दोन दुचाकी समोरासमोर एकमेकांना धडकल्या. यात तिघांचा  मृत्यू झाला. बोरगाव येथील भूषण ज्ञानेश्वर ढोले (वय २४) हा आपल्या दुचाकी क्र. महा. ३२ एएन. ३७८३ गावाला जात असताना टोल नाक्याजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळावरून अज्ञात वाहन पसार झाले होते.  

क्लिक करा - सावधान! .फेसबूकच्या `मार्केट प्लेस’वरून खरेदी करताय? होऊ शकते लाखोंची फसवणूक

दुसरी घटना पारडी येथून एकांबा येथे दुचाकीने रोशन बबन डोंगरे (वय ३० ) परत येत असताना वाटतेच जंगली डुक्कराने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीचालक गंभीर जखमी झाला. त्याला नागपूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले असता उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला.  रोशन हा विवाहित असून त्याला पत्नी दोन मुले आहे.  

तिसऱ्या घटनेत ठाणेगाव येथील कुंतेश्वर मुन्ने (वय २८) हा नागपूरला राहायचा. कोरोनामुळे गावी परत आला.  त्याच्या घरामालकाने घरभाडे मागणी केल्याने तो घरभाडे देण्यासाठी दुचाकीने नागपूर गेला होता. गावाला परत येत असताना राष्ट्रीय महामार्गवरील सातनवरी गावाजवळ विरुद्ध दिशेने दुचाकी घेऊन येत असलेल्या एकमेकांवर धडक दिली. 

अपघात इतका भयानक होता की यात कुंतेश्वर याच्या दुचाकीच्या समोरील भाग चेंदामेंदा झाला. कुंतेश्वर मुन्ने याचा जागीच मृत्यू झाला. कुंतेश्वर मुन्ने विवाहित आहे. त्याची पत्नी पाच महिन्याची गर्भवती आहे. बाळ येण्यापूर्वी नवऱ्याचं मृत्यू झाल्याने पत्नीला धक्का बसलाय. तर समोरील दुचाकी चालक गंभीर जखमी झाला.

नक्की वाचा - काय सांगता! इथे चक्क बदकं देताहेत अनेकांना रोजगार; राज्यातील एकमेव पैदास केंद्र

तालुक्यातील तीन तरुण युवकाचा काल रात्रीच्या सुमारास अवघ्या एका तासाच्या आत वेगवेगळ्या ठिकाणी अपघात घडला तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3 people are no more in accident in just one hour